Pune Video : पुणे शहराचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. पुण्यातील ऐतिहासिक वास्तु, प्राचीन मंदिरे, पुणेरी पाट्या, खाद्यपदार्थांचे अनेक व्हिडीओ चर्चेत येतात. तुम्ही आजवर अनेक पुणेरी पाट्या किंवा पुणेरी पाट्यांचे व्हिडीओ किंवा फोटो पाहिले असतील. सध्या असाच एक फोटो समोर आला आहे. हा फोटो पुण्यातील लोकप्रिय मार्केट तुळशीबाग परिसरातील आहे. या फोटोमध्ये एक पुणेरी पाटी दिसत आहे. ही पुणेरी पाटी नो पार्किंग परिसरात वाहने उभी करणाऱ्यांसाठी आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या पाटीवर काय लिहिलेय? आज आपण याविषयीच सविस्तर जाणून घेऊ या.
हा व्हायरल फोटो तुळशीबागेतील आहे. या फोटोमध्ये पाटी दिसत आहे. या पाटीवर लिहिलेय, “नो पार्किंग, वाहने उभी करू नये” या पाटीवर वर लिहिलेय, “मी गाढव, महामुर्ख माणूस आहे. मी गाडी इथेच लावणार” म्हणजेच जो नो पार्किंग परिसरात गाडी लावेल त्यांनी स्वत:ला गाढव, महामुर्ख माणूस समजावे, असा याचा अर्थ होतो. सध्या ही पाटी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.
तुळशीबाग ही पुण्यातील लोकप्रिय बाजारपेठ आहे. या परिसरात लोकांची भयानक गर्दी पाहायला मिळते. या ठिकाणी विविध दुकाने वाढलेली आहे. त्यामुळे येथे गाडी पार्क करणे अवघड आहे. म्हणून तुळशीबागेत अनेक ठिकाणी तुम्हाला नो पार्किंगच्या पाट्या दिसतील.
पाहा व्हायरल फोटो (PHOTO VIRAL)
pune_is_loveee या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा फोटो शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पुणेरी पाट्या..ठिकाण : तुळशीबाग , पुणे” या फोटोवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी यावर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.
हेही वाचा : ‘हीच तर संस्कृती…’ डॉक्टर बाळ घेऊन येताच आजी-आजोबांनी धरले पाय अन्…; VIRAL VIDEO चा शेवट जिंकेल तुमचं मन
काही दिवसांपूर्वी असाच एक पुणेरी पाटीचा फोटो व्हायरल झाला होता. या पाटीवर दारावरची बेल वाजवणाऱ्यांसाठी विशेष सुचना दिली होती. ही सुचना वाचून कोणीही पुन्हा दारावरची बेल वाजवणार नाही. त्या पाटीवर लिहिले होते “बेलसाठी लागणाऱ्या विजेचे पैसे आम्ही भरतो..एकदाच वाजवा” कमीत कमी शब्दांत समोरच्याचा अपमान करण्याची कला पुणेकरांकडे आहे. पुणेरी पाटी हे याचे उत्तम उदाहरण म्हणता येईल.