Puneri poster viral: सोशल मीडिया हे माहितीचं भंडार आहे. इथे अशा काही गोष्टी पाहायला किंवा ऐकायला मिळतात की कधीकधी त्यामुळे धक्काच बसतो. तर कधीकधी इथे मीम मटेरीयल देखील व्हायरल होतं, ज्याला कधी लोक डोक्यावर घेतात तर कधी ट्रोल करतात. हल्ली मुलांना मुली मिळणं कठीण झालंय. स्वभाव, कुटुंब व अनुरूपता न पाहता शेती-नोकरी, पगार, गाडी, स्वतःच घर आणि कुटुंबातील कमी सदस्यसंख्या यावरच हल्ली लग्न ठरत असतात. नणंद, दिर नको, सासू-सासऱ्यांपासून नवरा वेगळा हवा, त्याचा पुण्यात फ्लॅट हवा, अशा अपेक्षा सध्या मुलींसह पालकांकडून व्यक्त होत आहे. ‘असलाच नवरा पाहिजे हं…’ अशा मानसिकतेच्या मुलींमुळे अनेक मुले लग्नाच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान असाच एक वैतागलेला तरुण पोस्टर घेऊन थेट चौकात पोहचला आहे. या पोस्टरवर असं काही लिहलंय की वाचून तुम्हीही पोट धरुन हसाल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लग्नासाठी मुलाकडून प्रचंड अपेक्षा करणाऱ्या मुलींना या पुण्याच्या तरुणानं चोख उत्तर दिलंय. भर चौकात तरुण हातात पोस्टर घेऊन उभा आहे. येणारे जाणारे सगळे लोक हे पुणेरी पोस्टर पाहून थांबत आहेत. आता तुम्ही म्हणाल असं काय लिहलंय या पोस्टरवर ? तर या तरुणानं या पोस्टरवर “स्वत:ला पुण्यात फ्लॅट घ्यायला ६० वर्ष लागली, आणि जावई मात्र २५ व्या वर्षात २ फ्लॅटवाला पाहिजे…वाह रे दुनिया ” असा टोला लिहला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सर्वच समाजांत मुलींचे प्रमाण घटत आहे. अशातच मुलींचे शिक्षण वाढत असल्याने अनेक मुलींना आपल्याला अनुरूप मुलगाच हवा असतो. या वाढत्या अपेक्षेमुळे मात्र अल्पशिक्षित मुलांवर अविवाहित राहण्याची वेळ येते. मात्र कधी कधी मुलींच्या अपेक्षा नको तेवढ्या असतात. अशाच एका तरुणानं हा राग पोस्टरवर व्यक्त केला आहे.

पाहा फोटो

हेही वाचा >> “कितीही मोठे झालो तरी…” ट्रकच्या मागे लिहली भन्नाट शायरी; PHOTO पाहून कराल कौतुक

हा फोटो comedy_wala_basu या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून हा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने कमेंट केलीय की, “एकदम बरोबर”, तर दुसऱ्यानं कमेंट केली की, “मुलींच्या अपेक्षा वाढल्याने मुलांवर अविवाहित राहण्याची वेळ आलीय.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Puneri pati puneri poster goes viral on social media by watching people can not control laughing srk