Puneri poster viral: Puneri poster viral : सोशल मीडिया हे माहितीचं भांडार आहे. इथे अशा काही गोष्टी पाहायला किंवा ऐकायला मिळतात की, कधी कधी त्यामुळे धक्काच बसतो; तर कधी कधी इथे मीम मटेरीयलदेखील व्हायरल होतं, ज्याला कधी लोक डोक्यावर घेतात; तर कधी ट्रोल करतात. त्यातील काही व्हिडीओ हे हसविणारे असतात; तर काही रडविणारे आणि काही व्हिडीओ आपल्याला विचार करायला भाग पाडणारे असतात. तर, असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पुणेकर त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण तिरकस स्वभावासाठी नेहमी ओळखले जातात. त्यात पुणेकरांच्या पुणेरी पाट्या या नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. पुणेरी किस्से आणि पुणेरी पाट्या जगजाहीर आहेत. अशाच एका पुणेरी पाटीची चर्चा सध्या सगळीकडे जोरात सुरू आहे. एक पाटी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, यावेळी पुणेकरांनी या पाटीद्वारे कुणाचाही अपमान न करता, खरंच एक संदेश देण्याचा प्रयत्न केलाय. एरवी पुण्याबाहेरची पुणेकरांना नावं ठेवणारे लोकही या पाटीचं कौतुक करीत आहेत. तुम्ही पाहाच आता ही पाटी. ती पाहून म्हणाल आतापर्यंतची सगळ्यात भारी पुणेरी पाटी!

आतापर्यंतची सगळ्यात भारी पुणेरी पाटी

एक तरुण पोस्टर घेऊन थेट चौकात पोहोचला आहे. या पोस्टरवर असं काही लिहिलंय की, वाचून तुम्हीही विचार कराल. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, या पाटीवर तरुणानं सर्वांनाच उद्देशून एक संदेश दिला आहे. आता तुम्ही म्हणाल, असं काय लिहिलंय या पाटीवर? तर या तरुणानं या पाटीवर “कितीही मोठे व्हा, अवघं जग जिंका; परंतु सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसांना कधी विसरू नका.” यातून त्या तरुणाला सांगायचं आहे की, आयुष्यात कितीही मोठे झालात तरी तुमचं जे मूळ आहे, त्याला विसरू नका. तुमच्या सुरुवातीच्या संघर्षाच्या काळात किंवा अडचणींच्या वेळी तुम्हाला ज्यांनी मदत केली, आधार दिला, त्यांना विसरू नका.

यामध्ये मित्रमंडळींपासून आपले शिक्षक, आपले आई-वडील यांचाही समावेश असतो. काही वेळा मुलं शिक्षणासाठी शहराकडे जातात, नोकरीसाठी शहराकडे जातात. अशा वेळी दूरदेशी गेलेल्या पाखरांची वाट पाहणारे हे गावोगावचे उदास उंबरठे दरसालचे अपरिहार्य ऋतू हतबल होत, वेदना सोसत पुढे पुढे नेत राहतात. कधीतरी पाखरं पुन्हा फिरतील घरट्याकडे, या खात्रीशून्य आशेनं. अशा आपल्या आई-वडिलांना विसरू नका, असा संदेश या तरुणानं दिला आहे. तसेच झाडे लावा, झाडे जगवा, असाही संदेश यातून दिलेला आहे.

पाहा पाटी

हेही वाचा >> ‘बस्स! एवढं श्रीमंत व्हायचंय’; ट्रॅफिकमधून वाचण्यासाठी तरुणीनं केलं असं काही की… बघून नेटकरीही झाले अवाक्

ही पोस्ट इन्स्टाग्रामवर comedy_wala_basu नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. नेटकरीही त्या पोस्टचं कौतुक करीत आहेत. एकानं लिहलंय, “आतापर्यंतची सगळ्यात भारी पुणेरी पाटी.” तर आणखी एका युजरने “एक नंबर भाऊ”, अशीही कमेंट केलीय.

सुरुवातीला पेठांमध्येच असलेली पुणेरी पाटी शहर पसरत गेले तसे या पाट्यांचे लोण संपूर्ण पुण्यात पसरले. कमीत कमी शब्दांत समोरच्याचा जास्तीत जास्त अपमान करण्याची कला पुणेकरांनाच साधली आहे, असे म्हणतात. त्याचप्रमाणे कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त खवचट आशय व्यक्त करणारी पुणेरी पाटीही कोणी येरागबाळा बनवू शकत नाही. पुणेरी पाट्या म्हणजे पुणेकरांसाठी अभिमानाचा वारसा. केवळ बुद्धिमत्ता नाही, तर खास पुणेरी तैलबुद्धीतून पाट्यांच्या माध्यमातून पुणेकरांचा स्पष्टवक्तेपणा आणि थेट भिडण्याची वृत्ती दिसून येते.