Puneri poster viral: सध्या मुलांच्या लग्नाचा विषय फारच गंभीर होत चाललाय. हल्ली मुलांना मुली मिळणं कठीण झालंय. स्वभाव, कुटुंब व अनुरूपता न पाहता शेती-नोकरी, पगार, गाडी, स्वतःच घर आणि कुटुंबातील कमी सदस्यसंख्या यावरच हल्ली लग्न ठरत असतात. नणंद, दिर नको, सासू-सासऱ्यांपासून नवरा वेगळा हवा, त्याचा पुण्या-मुंबईत फ्लॅट हवा, अशा अपेक्षा सध्या मुलींसह पालकांकडून व्यक्त होत आहे. ‘असलाच नवरा पाहिजे हं…’ अशा मानसिकतेच्या मुलींमुळे अनेक मुले लग्नाच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान असाच एक वैतागलेला तरुण पोस्टर घेऊन थेट चौकात पोहचला आहे. या पोस्टरवर असं काही लिहलंय की वाचून तुम्हीही पोट धरुन हसाल.
“तिच्या बापानं अजून मुंबई पाहिली नाही…”
लग्नासाठी मुलाकडून प्रचंड अपेक्षा करणाऱ्या मुलींना या पुण्याच्या तरुणानं चोख उत्तर दिलंय. भर चौकात तरुण हातात पोस्टर घेऊन उभा आहे. येणारे जाणारे सगळे लोक हे पुणेरी पोस्टर पाहून थांबत आहेत. आता तुम्ही म्हणाल असं काय लिहलंय या पोस्टरवर ? तर या तरुणानं या पोस्टरवर “तिच्या बापानं अजून मुंबई पाहिली नाही आणि मुलीला मुंबईमध्ये फ्लॅट पाहिजे म्हणे…वारे दुनिया” असा टोला लिहला आहे.
मुलींच्या अपेक्षा वाढल्या
जो तरुण पुण्यामुंबई सारख्या शहरात नोकरीला आहे .अशा तरुणांना आपली मुलगी द्यावी असं लोकांना वाटू लागले आहे.सध्याची लग्नसंस्था पैशाभोवती फिरणारी मागील काही दिवसांत तरुणांना मुलगी मिळण्याचे वास्तव भयानक झाल्यामुळे काही लोकांनी मुलींच्या कुटुंबियांना पैसे देण्याची प्रथा सुरू केली आहे. ही प्रथा आजही खेड्यापाड्यात सर्रासपणे सुरू आहे. ही बाब तरुणांसाठी जास्तच त्रासदायक ठरत आहे.विवाहाची जबाबदारी पडण्यापूर्वी करिअर घडविणे हल्लीच्या मुलामुलींना योग्य वाटते. मग शिक्षण, नोकरी, स्पर्धा परीक्षांच्या नादात त्यांच्याही नकळत विवाहयोग्य वय वाढत जाते. नोकरी मिळाल्यानंतरही तीत स्थैर्य हवे अशा अपेक्षेने काही मुले स्वतःच उशिरा बोहल्यावर चढतात.
पाहा पुणेरी पाटी
ही पुणेरी पाटीची पोस्ट comedy_wala_basu या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आली असून हा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने कमेंट केलीय की, “एकदम बरोबर”, तर दुसऱ्यानं कमेंट केली की, “मुलींच्या अपेक्षा वाढल्याने मुलांवर अविवाहित राहण्याची वेळ आलीय.”