Viral puneri pati: शब्दांत समोरच्याचा जास्तीत जास्त अपमान करण्याची कला पुणेकरांनाच साधली आहे, असे म्हणतात. त्यात पुणेकरांच्या पुणेरी पाट्या ह्या नेहमी चर्चेच्या विषय ठरतात. पुणेरी किस्से आणि पुणेरी पाट्या जगजाहीर आहेत. अशाच एका पुणेरी तरुणानं भर चौकात अशी पाटी झळकवली की येणारा जाणारा प्रत्येकजण वाचून थांबू लागला. असं काय लिहलंय या पाटीवर तुम्हीच वाचा. एका पुणेकर तरुणानं भर चौकात पुणरी पाटी झळकवत खड्ड्यांमुळे टीका केली आहे. एक वैतागलेला तरुण पोस्टर घेऊन थेट चौकात पोहचला आहे. या पोस्टरवर असं काही लिहलंय की पाहणारा प्रत्येकजण बरोबर आहे भाऊ म्हणतोय.

पावसाळा आणि रस्त्यावरील खड्डे हे समीकरणच झाले आहे. खड्डे घेऊन नेमेची येतो पावसाळा असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. खड्डे हा राज्यातील प्रत्येक नागरिकासाठी महत्त्वाचा विषय. कारण खड्ड्यांमुळे होणारा त्रास हा कधी कधी नव्हे तर दररोज भोगावा लागत असतो. सरकारकडून रस्त्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने वारंवार यावरून संताप व्यक्त केला जातो. गणेशोत्सव अवघ्या एका दिवसांवर आलेला असतानाही शहरातील अनेक रस्त्यांवर पडलेले खड्डे तसेच असल्याची तक्रार नागरिकांकडून आणि वाहनचालकांकडून केली जात होती. रस्त्यावर पडलेले खड्डे तातडीने दुरुस्त करावेत, यासाठी राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून पालिका आयुक्तांना भेटून निवेदने देण्यात आली होती.

When and where will flood-affected Ektanagari residents be relocated
पूरग्रस्त एकतानगरीचे होणार स्थलांतर नक्की कधी आणि कुठे?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
nana patole
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजेच ‘ऑपरेशन लोटस’,पटोलेंचा घणाघात
Woman police officer abused for not taking action on vehicle
पिंपरी : कारवाई करू नये म्हणून महिला पोलिसाला शिवीगाळ
gadhimai festival in nepal animal slaughtered
‘या’ उत्सवात दिला जातो हजारो जनावरांचा बळी; काय आहे गढीमाई उत्सव? याला जगातील सर्वांत रक्तरंजित उत्सव का म्हटले जाते?
eknath khadse devendra fadnavis
उलटा चष्मा : पांढरे निशाण…
BJP leaders vikasrao dube son amol dube kidnapped from Parli ransom of Rs 2 crore demanded
परळीतून भाजप नेत्याच्या मुलाचे अपहरण; दोन कोटींच्या खंडणीची मागणी
Moshi International Exhibition Center, garbage dump,
पुणे : मोशीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र कचऱ्याच्या विळख्यात

काय लिहलंय पाटीवर ?

पुण्यात भर चौकात हातात पाटी धरुन उभा राहिलेल्या या तरुणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता तुम्ही म्हणाल या पाटीवर असं लिहलंय तरी काय ? तर या पाटीवर, “आम्ही पुण्यात नाही पाण्यात राहतो. राजकारणी होते प्रचारात व्यस्त, आता जनता होते रस्त्यावर त्रस्त” या व्हिडीओमध्ये दिसत आहे, रस्त्यावरुन जाणारा एकूण एक व्यक्ती ही पाटी पाहून थांबलेला दिसत आहे. एवढचं नाही तर प्रत्येक नागरीक याच्याशी सहमत आहे. अनेक जण तरुणाला बरोबर आहे म्हणत खुणावतानाही दिसत आहेत. तर काही जण या पाटीचा फोटो काढताना दिसत आहे.

नेटकरी या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत, एकानं म्हंटलंय, “प्रशासन जहाज वाटणार आहे आता पुण्यात” तर आणखी एकानं कमेंट केलीय, “एकदम बरोबर बोल्लास भावा”

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> PHOTO: पुणेकरांचा नाद नाय! गेट समोर गाडी पार्क करणाऱ्यांना आकर्षक बक्षिसे; शेवटचं बक्षिस वाचून पोट धरुन हसाल

पुणे शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविले जात नसल्याबाबत पालिका प्रशासनावर टीकेची झोड उठल्यानंतर पथ विभागाने रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले आहे. सध्या पावसाने दिलेल्या उघडिपीचा फायदा घेत पालिकेने गेल्या ९ दिवसांत ४९९ पेक्षा अधिक खड्डे बुजविले आहेत. पुढील दोन दिवसांत युद्धपातळीवर काम करून शहरातील सर्व महत्त्वाच्या रस्त्यांवरील खड्ड्यांच्या दुरुस्तीचा प्रयत्न केला जाणार आहे.

Story img Loader