Puneri pati: पुणेरी पाट्या हा वर्षानुवर्षे चर्चेत राहिलेला विषय आहे. पुणेकरांच्या या पुणेरी पाट्या जितक्या वाचायला मजेशीर असतात तितक्याच त्या खोचकपणे चांगला संदेश देऊन जातात. पुणेकरांची शान असलेली ही पाटी अनेकदा लोकांचा अपमान करते; पण नियम म्हणजे नियम आणि याचे पालन केलेच पाहिजे, असा धडा शिकवून जाते.
पुणेरी पाट्यांचा जरा विशेष थाटच आहे. या पाट्या फक्त पुण्यातच नाहीतस तर जगभरात प्रसिद्ध आहेत. पुणेकऱ्यांच्या या पाटीचं कौतुक तर अनेक जण करतात; पण त्याच्यावर अनेकदा टीकाही होते.
हेही वाचा… “मुलगी काळी…”, नवरदेवाने घेतला जगात भारी उखाणा, VIDEO पाहून कराल कौतुक
सोशल मीडियावर अनेकदा या पाट्यांचे फोटो व्हायरल होत असतात. तुम्ही अनेकदा दुकानाबाहेरील पाटी, भिंतीवर लावलेली पोस्टर्स पाहिले असतील. पण, सध्या शेतातील एक पाटी सोशल मीडियावर व्हायरल होतंय. नेमकं काय लिहिलंय त्या पाटीवर ते पाहू या…
शेताजवळील व्हायरल पाटी
सोशल मीडियावर व्हायरल झालेली ही पाटी सध्या चर्चेत आहे. या पाटीमध्ये “परवानगीशिवाय आत येऊ नये. आपण कॅमेऱ्याच्या कक्षेत आहात. येथे शौचास बसल्यास आपला व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पाहण्यास मिळेल. याची नोंद घ्यावी ही विनंती.” अशा प्रकारचा खोचक संदेशवजा इशारा पाटीद्वारे देण्यात आला आहे.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हायरल झालेली ही पाटी @viralinmaharashtra या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. पाटी व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करीत लिहिलं, “एक कोणी तरी येईल आणि म्हणेल बघू बर कसा येतो व्हिडीओ” तर दुसऱ्याने “हा शेवटचा उपाय” अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करत म्हणाला, “आम्ही तुमचा कॅमेरा चोरी करून घेऊन जाऊ”
हेही वाचा… मुलांनो असा डान्स येत असेल तरच लग्न करा! वरातीत नवरदेवाने धरला ठेका, VIDEO पाहून पोट धरून हसाल
दरम्यान, ही पुणेरी स्टाईल पाटी नेमकी कुठली आहे याबाबत माहिती मिळू शकलेली नाहीये. मात्र, पाटी लिहणारा नक्कीच पुणेकर असणार, असं नेटकरी म्हणत आहेत.