Viral Photo: पुणेकर त्यांच्या वैशिष्टपूर्ण तिरकस स्वभावासाठी नेहमी ओळखले जातात. त्यात पुणेकरांच्या पुणेरी पाट्या ह्या नेहमी चर्चेच्या विषय ठरतात. पुणेरी किस्से आणि पुणेरी पाट्या जगजाहीर आहेत. अशाच एका पुणेरी पाटीची चर्चा सध्या सगळीकडे जोरात सुरू आहे. एका कारच्या मागची पाटी सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. कार, ट्रक, बस अशा विविध वाहनांकडून महामार्गावर तर म्युझिकल हॉर्न वाजवले जाताता. अनेक वेळा ट्रॅफिकमध्ये अडकलेले लोक विनाकारण हॉर्न वाजवतात. काही लोक सिग्नल असल्यावर देखील हॉर्न वाजवतात. ट्रक, रिक्षावर विनाकारण ‘हॉर्न वाजवू नका’ असा संदेश लिहिलेला तुम्ही पाहिला असेल. पण तरी देखील लोक हॉर्न वाजवतात. आता विनाकारण हॉर्न वाजवणाऱ्यांना एका कार चालकानं मजेशीर टोला लगावला आहे. या पाटीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ही कारच्या मागची पाटी पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल.

आपला नम्र, एक पुणेकर

या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता, काही लोक रस्त्यावर लोकांना त्रास देण्यासाठी हॉर्न वाजवतात. अशा लोकांना या कारचालकानं हा टोला लगावला आहे. आता या कारची प्रश्नाची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. आता तुम्ही म्हणाल असं लिहलंय तरी काय? तर या कारचालकानं कारच्या मागे “आम्ही रस्त्यात मुक्काम करीत नाही, कृपया हॉर्न वाजवु नये. आपला नम्र, एक पुणेकर” असा आशय लिहत टोला लगावलाय.

पाहा पुणेरी पाटी

हेही वाचा >> प्लॅटफॉर्मवर उभ्या प्रवाशाची चालत्या ट्रेनमधून कॉलर पकडली; फरफटत नेलं अन्…रेल्वे स्टेशनवरचा थरारक VIDEO व्हायरल

puneriguide नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन या कारचा फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोला ३३ हजारपेक्षा जास्त लोकांनी लाइक केलं आहे. तर अनेकांनी या फोटोला मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. यावर एका युजरने कमेंट करत लिहिलं, ‘मी अनेक वेळा सिग्नलवर हॉर्न वाजवणाऱ्यांना ‘उपरसे ले जा’ असा रिप्लाय दिला आहे.

पुणे तिथे काय उणे

‘तुम्हाला प्रत्येक विषयात स्वत:चे मत नसेल तर येथे प्रवेश नाही’ अशा इशार्‍यापासून ते ‘पगडीखालची खरी बुद्धिमत्ता काय असते हे पाहायचंय?’ असे आव्हान फक्त एकाच शहरात दिले जाऊ शकते, ते म्हणजे पुणे. सुरुवातीला पेठांमध्येच असलेली पुणेरी पाटी शहर पसरले तशी संपूर्ण पुण्यात पसरली.कमीत कमी शब्दांत समोरच्याचा जास्तीत जास्त अपमान करण्याची कला पुणेकरांनाच साधली आहे, असे म्हणतात. त्याचप्रमाणे कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त खवचट आशय व्यक्त करणारी पुणेरी पाटीही कोणी येरा गबाळा बनवू शकत नाही.पुणेरी पाटय़ा म्हणजे पुणेकरांसाठी अभिमानाचा वारसा. केवळ बुद्धिमत्ता नाही तर खास पुणेरी तैलबुद्धीतून पाटय़ांच्या माध्यमातून पुणेकरांचा स्पष्टवक्तेपणा आणि थेट भिडण्याची वृत्ती झळकते.