Puneri Pati: सोशल मीडियावर दररोज असंख्य फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात पुणेरी पाट्या चर्चेचा विषय ठरतो. तसेच पोस्टर बॉयचे अनोखे फोटोही व्हायरल होत असतात. या पुणेरी पाट्या आणि पोस्टर्स जितकी वाचायला मजेशीर असतात, तितकेच कित्येकदा त्यावरील वेगवेगळे संदेश काहीतरी देऊन जाणारे असतात.
पुणेरी पाट्यांचा तर विशेष थाट असतो. या पाट्या फक्त पुण्यातच नाहीत, तर जगभरात प्रसिद्ध आहेत. पुणेकऱ्यांच्या या पाटीचं कौतुक तर अनेक जण करतात; पण त्याच्यावर अनेकदा टीकाही होते. तसंच पोस्टर बॉय आधुनिक पिढीच्या संदर्भात अनेक मेसेज पोस्टर्सद्वारे शेअर करत असतात. सध्या अशीच एक पोस्टर बॉयची पाटी चर्चेत आली आहे. त्याचं नेमकं म्हणणं काय आहे, ते जाणून घेऊ…
पाटी होतेय व्हायरल
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पाट्यांबरोबरच सध्या ही पाटीही खूप व्हायरल होत आहे. रस्त्याच्या मधोमध ही पाटी घेऊन एक मुलगा उभा आहे. “बॉयफ्रेंड बेवडा असला तरी चालतो; पण नवरा निर्व्यसनी पाहिजे” असं या पाटीवर लिहिलं आहे. अगदी खोचक; पण थेट वक्तव्य या पाटीवर लिहिलेलं दिसतंय.
सोशल मीडियावर व्हायरल झालेली ही पाटी @viralinmaharashtra या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. पाटी व्हायरल होताच त्यावर खूप लाइक्स आणि कमेंट्स आल्या आहेत.
हेही वाचा… दारूच्या नशेत महिलेची दादागिरी! कॅबमध्ये ड्रायव्हरबरोबर केलं असं कृत्य की…, VIDEO पाहून येईल संताप
युजर्सच्या प्रतिक्रिया
पाटी व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करीत लिहिलं, “नवरा चांगला निघेल याची काय गॅरंटी आहे, तो मुलगी बघायला येताना दारूची बाटली घेऊन थोडी येणार आहे.” तर दुसऱ्याने “हे अगदी खरंय” अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करीत म्हणाला, “कारण त्यांना बॉयफ्रेंडबरोबर आयुष्य घालवायचं नसतं.” एकाने “बॉयफ्रेंड काही दिवसांसाठी असतो आणि नवरा पूर्ण आयुष्यभरासाठी” अशी कमेंट केली.