Puneri pati viral: पुणेकर त्यांच्या वैशिष्टपूर्ण तिरकस स्वभावासाठी नेहमी ओळखले जातात.‘तुम्हाला प्रत्येक विषयात स्वत:चे मत नसेल तर येथे प्रवेश नाही’ अशा इशार्यापासून ते ‘पगडीखालची खरी बुद्धिमत्ता काय असते हे पाहायचंय?’ असे आव्हान फक्त एकाच शहरात दिले जाऊ शकते, ते म्हणजे पुणे. कमीत कमी शब्दांत समोरच्याचा जास्तीत जास्त अपमान करण्याची कला पुणेकरांनाच साधली आहे, असे म्हणतात. त्यात पुणेकरांच्या पुणेरी पाट्या ह्या नेहमी चर्चेच्या विषय ठरतात. पुणेरी किस्से आणि पुणेरी पाट्या जगजाहीर आहेत. अशाच एका पुणेरी पाटीची चर्चा सध्या सगळीकडे जोरात सुरू आहे. कुणाच्याही नादाला लागा पण पुणेकरांच्या नादाला लागू नका असं म्हंटलं जातं. याचीच प्रचिती देणारी एक पुणेरी पाटी सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
गेटसमोर गाडी पार्क करणाऱ्याला आकर्षक बक्षिसं
पुणेकरांचा स्पष्टवक्तेपणा आणि थेट भिडण्याची वृत्ती झळकते. आपण अनेकदा पाहिलं असेल खास करुन पुण्यात घराबाहेर वेगवेगळ्या पाट्या लावलेल्या असतात, अशीच एक पाटी पुण्यात एका घराबाहेर लावली होती. या पाटीवर गेटसमोर गाडी उभी करणाऱ्यांना थेट धमकी दिली आहे. तसंच गेटसमोर गाडी उभी करणाऱ्यांना आकर्षक बक्षिसंही ठेवली आहेत. ही बक्षिसं वाचून तुम्हीही म्हणाल पुणेकरांचा तर नादच नाही.. ही पाटी वाचून कोणी चूकूनही गेटसमोर पार्किंग करायची हिम्मत नाही करणार.
शेवटचं बक्षिस वाचून पोट धरुन हसाल
आता तुम्ही म्हणाल या पाटीवर असं लिहलंय तरी काय? तर या पाटीवर थेट गेटसमोर गाडी उभी करणाऱ्यांना धमकीच दिलीय. “आमच्या घरातील मुले क्रांतीकारक आहेत. त्यामुळे गेटसमोरील गाडीवर हल्ला झाल्यास आम्ही जबाबदार नाही. गाडीसमोरील गेट आपणास दिसले नसल्यास थोळ्यावेळाने गेटसमोरील गाडीही दिसणार नाही याची खात्री बाळगा. गाडी गेटसमोर लावा आणि आकर्षक बक्षिस मिळवा. १. पंक्चर टायर, २. फाटलेली सीट, ३.फुटलेली हेडलाईट, ४. पेट्रोलची रिकामी टाकी. आणि बंपर इनाम: गाडी पोलीस स्टेशनमध्ये.” ही पाटी पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> VIDEO: “एका रात्रीत अर्धी मुंबई रिकामी करायची ताकद” वाहनांची प्रचंड गर्दी; मुंबई-गोवा हायवेवर लोक रस्त्यावर उतरले
हा फोटो सोशल मीडियावर jagatbharipune नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. अशा अनेक पुणेरी पाट्या रोज व्हायरल होत असतात. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत, एकानं म्हटलंय “पुणेकरांचा नाद नाय” तर दुसरा म्हणतो “बाप रे एवढच अजून काही”