Puneri pati viral: पुणेकर त्यांच्या वैशिष्टपूर्ण तिरकस स्वभावासाठी नेहमी ओळखले जातात.‘तुम्हाला प्रत्येक विषयात स्वत:चे मत नसेल तर येथे प्रवेश नाही’ अशा इशार्‍यापासून ते ‘पगडीखालची खरी बुद्धिमत्ता काय असते हे पाहायचंय?’ असे आव्हान फक्त एकाच शहरात दिले जाऊ शकते, ते म्हणजे पुणे. कमीत कमी शब्दांत समोरच्याचा जास्तीत जास्त अपमान करण्याची कला पुणेकरांनाच साधली आहे, असे म्हणतात. त्यात पुणेकरांच्या पुणेरी पाट्या ह्या नेहमी चर्चेच्या विषय ठरतात. पुणेरी किस्से आणि पुणेरी पाट्या जगजाहीर आहेत. अशाच एका पुणेरी पाटीची चर्चा सध्या सगळीकडे जोरात सुरू आहे. कुणाच्याही नादाला लागा पण पुणेकरांच्या नादाला लागू नका असं म्हंटलं जातं. याचीच प्रचिती देणारी ही पाटी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पुणेकरांचा स्पष्टवक्तेपणा आणि थेट भिडण्याची वृत्ती झळकते. आपण अनेकदा पाहिलं असेल खास करुन पुण्यात घराबाहेर वेगवेगळ्या पाट्या लावलेल्या असतात, अशीच एक पाटी पुण्यात एका घराबाहेर लावली होती. या पाटीवर गेटसमोर गाडी उभी करणाऱ्यांना असा टोला लगावला आहे की वाचून तुम्हीही अवाक् व्हाल.गाडी नो पार्किंगमध्ये लागली, की ती ‘टो’ होण्याची भीती असतेच. पण आपल्याकडे अनेकजण या भीतीच्या पलिकडे गेले आहेत. वारंवार सांगूनही बेशिस्तपणे गाड्या पार्क करण्याचे प्रताप आपल्या आजूबाजूला होताना सहज दिसतील. त्यासाठी फार शोधाशोध करण्याची गरज नाही. बेशिस्त पार्किंग करणाऱ्यांना आवरण्यासाठी काहीतरी करायला तर हवं! फक्त गाडी ‘टो’ करुन, दंडांच्या पावत्या फाडून बेशिस्त पार्किग करणारे ताळावर येण्याची शक्यता कधीचीच संपुष्टात आली आहे. अशावेळी काहीतरी नवं करण्याची गरज आहे. हेच या पुणेकरांनी केलं.

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Heart touching video of a kid crying and asking mother to come early from work emotional video viral on social media
रडत रडत तिच्याजवळ गेला अन्…, कामावर जाणाऱ्या आईला मुलाची विनवणी, VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील
Girl claims her bf to be in Delhi Police, tries to threaten fellow passenger during altercation on metro
“माझा बॉयफ्रेंड दिल्ली पोलिस….” दिल्ली मेट्रोत तरुणीची दादागिरी, प्रवासी महिलेबरोबर जोरदार भांडण, Video Viral
pune video
“चला गोल फिरा..” ही पुणेरी पाटी कशासाठी? Video होतोय व्हायरल
Central government Digital arrest
देशभरात ‘डिजीटल अरेस्ट’ची धास्ती, काय दिला जातो जनजागृतीपर संदेश
Balasaheb-Thorat
Balasaheb Thorat : बाळासाहेब थोरात यांची सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणावरुन सरकारवर टीका, “सरकारची मानसिकता…”
Mumbai railway platform Thief got caught stealing wallet inside shocking video goes viral
मुंबईकरांनो चोरी करण्याची ‘ही’ पद्धत पाहा आणि सावध व्हा; रेल्वे स्टेशनवर प्रवाशांच्या मागे उभे राहतात अन्…VIDEO एकादा पाहाच

काय लिहलंय पाटीवर ?

आता तुम्ही म्हणाल असं लिहलंय तरी काय या पाटीवर? तर या पाटीवर थेट गेटसमोर गाडी उभी करणाऱ्यांना धमकीच दिलीय. सुरुवातीला मोठ्या ठळक अक्षरात “खाजगी पार्किंग असं लिहलं आहे, त्यानंतर २ मिनिटं लावतो, पैसे घ्या पार्किंगचे अशी फालतू कारणे, सूचना देऊ नये. पाटी वाचूनही जे मूर्ख गाडी लावतील, अशा अनधिकृत गाड्यांना रस्त्यावर टाकण्यात येईल याची नोंद घ्यावी.”

सर्वात शेवटी, “रस्त्यावर गाडी टाकताना आणि टाकल्यानंतर गाडीला काही झाले तर त्याला गाडी इथे लावणारी व्यक्तीचं जबाबदार असेल. – आदेशावरुन.” आता तुम्हीच सांगा एवढा अपमान आणि धमकी दिल्यानंतर कोणी इथे गाडी पार्क करायाचा विचारही करणार नाही.

पाहा पुणेरी पाटी

हेही वाचा >> VIDEO: बापरे! ‘तो’ जहाजातून थेट समुद्रात पडला; ४० मिनिटांनंतर जे घडलं ते पाहूनच बसेल धक्का

हा फोटो सोशल मीडियावर Omkar Chirme नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. अशा अनेक पुणेरी पाट्या रोज व्हायरल होत असतात.

Story img Loader