Puneri pati viral: पुणेकर त्यांच्या वैशिष्टपूर्ण तिरकस स्वभावासाठी नेहमी ओळखले जातात.‘तुम्हाला प्रत्येक विषयात स्वत:चे मत नसेल तर येथे प्रवेश नाही’ अशा इशार्‍यापासून ते ‘पगडीखालची खरी बुद्धिमत्ता काय असते हे पाहायचंय?’ असे आव्हान फक्त एकाच शहरात दिले जाऊ शकते, ते म्हणजे पुणे. कमीत कमी शब्दांत समोरच्याचा जास्तीत जास्त अपमान करण्याची कला पुणेकरांनाच साधली आहे, असे म्हणतात. त्यात पुणेकरांच्या पुणेरी पाट्या ह्या नेहमी चर्चेच्या विषय ठरतात. पुणेरी किस्से आणि पुणेरी पाट्या जगजाहीर आहेत. अशाच एका पुणेरी पाटीची चर्चा सध्या सगळीकडे जोरात सुरू आहे. कुणाच्याही नादाला लागा पण पुणेकरांच्या नादाला लागू नका असं म्हंटलं जातं. याचीच प्रचिती देणारी एक पुणेरी पाटी सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

पुणेकरांचा स्पष्टवक्तेपणा आणि थेट भिडण्याची वृत्ती झळकते. आपण अनेकदा पाहिलं असेल खास करुन पुण्यात घराबाहेर वेगवेगळ्या पाट्या लावलेल्या असतात, अशीच एक पाटी पुण्यात एका घराबाहेर लावली होती. या पाटीवर गेटसमोर गाडी उभी करणाऱ्यांना थेट धमकी दिली आहे. गाडी नो पार्किंगमध्ये लागली, की ती ‘टो’ होण्याची भीती असतेच. पण आपल्याकडे अनेकजण या भीतीच्या पलिकडे गेले आहेत. वारंवार सांगूनही बेशिस्तपणे गाड्या पार्क करण्याचे प्रताप आपल्या आजूबाजूला होताना सहज दिसतील. त्यासाठी फार शोधाशोध करण्याची गरज नाही. बेशिस्त पार्किंग करणाऱ्यांना आवरण्यासाठी काहीतरी करायला तर हवं! फक्त गाडी ‘टो’ करुन, दंडांच्या पावत्या फाडून बेशिस्त पार्किग करणारे ताळावर येण्याची शक्यता कधीचीच संपुष्टात आली आहे. अशावेळी काहीतरी नवं करण्याची गरज आहे. हेच या पुणेकरांनी केलं.

reporter abused while reporting
पिंपरी- चिंचवडमध्ये पोलिसांसमोरच प्रसारमाध्यमांच्या पत्रकारांना दमदाटी; देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
2nd October Rashi Bhavishya & Panchang
२ ऑक्टोबर पंचांग: सर्वपित्री अमावस्या कोणासाठी ठरणार शुभ?…
ie thinc fourth edition
‘हवामान बदल थोपवण्यासाठी निधीची गरज’
Student Support Committee Pune  organization working for needy students
स्कॉलरशिप फेलोशिप: ‘विद्यार्थी साहाय्यक समिती, पुणे’; गरजू विद्यार्थ्यांचा पुण्यातला हक्काचा आधारवड
Mercedes-Benz, Supriya Sule, Supriya Sule latest news,
मर्सिडिज बेंझला नोटीस देण्याच्या टायमिंगवर शंका; खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, “शासनाने…”
when jaya bachchan father talked about amitabh bachchan accident
अमिताभ बच्चन यांना जीवघेण्या अपघातातून वाचवणाऱ्या डॉक्टरांना पुरेसं श्रेय दिलं नाही, त्यांच्या सासऱ्यांनी केलेलं वक्तव्य
shivshardul percussion indian band in usa
अमेरिकेतील शिवशार्दूल पर्कशन्सच्या ढोल-ताशा गर्जनेची दशकपूर्ती
Asaduddin-Owaisi-1
ताजमहलच्या गळतीवरून असदुद्दीन ओवेसींचे भारतीय पुरातत्व विभागाच्या कार्यपद्धीवर ताशेरे; म्हणाले, “हे म्हणजे १० वीत नापास विद्यार्थ्याने…”

काय लिहलंय पाटीवर ?

आता तुम्ही म्हणाल असं लिहलंय तरी काय या पाटीवर? तर या पाटीवर थेट गेटसमोर गाडी उभी करणाऱ्यांना धमकीच दिलीय. सुरुवातीला मोठ्या ठळक अक्षरात “बघतोस काय? नो पार्किंग आहे.” असं लिहलं आहे. आता तुम्हीच सांगा एवढा अपमान आणि धमकी दिल्यानंतर कोणी इथे गाडी पार्क करायाचा विचारही करणार नाही. ही पुणेरी पाटी वाचून तुम्हीही पोट धरुन हसाल.

पाहा पुणेरी पाटी

हेही वाचा >> VIDEO: “…तरच आम्ही काम करु” ऑफिसच्या दरवाजावर चिठ्ठी लावत कर्मचाऱ्यांनी बॉसला दिलं चॅलेंज; शेवटी काय झालं पाहा

सोशल मीडियावर हा फोटो सोशल मीडियावर aapalviralpune नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. अशा अनेक पुणेरी पाट्या रोज व्हायरल होत असतात.