Puneri pati: पुणे म्हटलं की पुणेरी पाट्या लक्षात येतातच. पुणेरी पाट्या या अनेकदा चर्चेचा विषय बनतात. कधी वाद तयार करतात तर कधी वादावर भाष्य करतात. कधी चांगला संदेश देतात तर कधी चांगलाच संदेश पोहोचवतात. अशीच एक पुणेरी पाटी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.बिना व्यक्त होता आपली मतं ठामपणे आणि थेट मांडण्याचं पुणेकरांच माध्यम म्हणजे पुणेरी पाटी. पुणेकर त्यांच्या वैशिष्टपूर्ण तिरकस स्वभावासाठी नेहमी ओळखले जातात. त्यात पुणेकरांच्या पुणेरी पाट्या ह्या नेहमी चर्चेच्या विषय ठरतात. पुणेरी किस्से आणि पुणेरी पाट्या जगजाहीर आहेत. अशाच एका पुणेरी पाटीची चर्चा सध्या सगळीकडे जोरात सुरू आहे. एक पाटी सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. ही पाटी वाचून तुम्हीही पोट धरुन हसाल.

आता लग्नसराईचा सिझन जवळ आलाय सगळीकडे लग्नाच्या तयारीची गडबड सुरु आहे. अशातच एका पुणेकरांनी आपल्या मुलाच्या लग्नासाठी स्थळ आणणाऱ्यांसाठी एक पाटी घराबाहेर लावली आहे. ही पुणेरी पाटी वाचून तुम्हीही पोट धरुन हसाल. घरात लग्नाची मुलं किंवा मुली असतील तर साहजीकच नातेवाईक, शेजारी, मित्र मैत्रीणी त्यांच्यासाठी स्थळ सुचवतात. दरम्यान अशी स्थळ सुचवणाऱ्यांनाच या पुणेरी पाटीवरुन टोला लगावला आहे.

“आमच्या मुलाचे लग्न…”

आता तुम्ही म्हणाल असं लिहलंय तरी काय? तर या घराबाहेर लावलेल्या पाटीवर “आमच्या मुलाचे लग्न आता ठरले आहे कृपया स्थळ आणू नयेत” असं लिहलं आहे. एखाद्याचा थेट अपमान कसा करायचा हे पुण्यात गेल्यावर कळते.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: पाण्यात लवकर विरघळणारा पदार्थ कोणता? कोल्हापुरच्या रिक्षा चालकानं लिहलं भन्नाट उत्तर; वाचून तुम्हीही पोट धरुन हसाल

‘तुम्हाला प्रत्येक विषयात स्वत:चे मत नसेल तर येथे प्रवेश नाही’ अशा इशार्‍यापासून ते ‘पगडीखालची खरी बुद्धिमत्ता काय असते हे पाहायचंय?’ असे आव्हान फक्त एकाच शहरात दिले जाऊ शकते, ते म्हणजे पुणे. सुरुवातीला पेठांमध्येच असलेली पुणेरी पाटी शहर पसरले तशी संपूर्ण पुण्यात पसरली.कमीत कमी शब्दांत समोरच्याचा जास्तीत जास्त अपमान करण्याची कला पुणेकरांनाच साधली आहे, असे म्हणतात. त्याचप्रमाणे कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त खवचट आशय व्यक्त करणारी पुणेरी पाटीही कोणी येरा गबाळा बनवू शकत नाही.पुणेरी पाटय़ा म्हणजे पुणेकरांसाठी अभिमानाचा वारसा. केवळ बुद्धिमत्ता नाही तर खास पुणेरी तैलबुद्धीतून पाटय़ांच्या माध्यमातून पुणेकरांचा स्पष्टवक्तेपणा आणि थेट भिडण्याची वृत्ती झळकते.