Puneri pati:  दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. भारतभर दिवाळी मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते. दिवाळी येण्याअगोदरच नवीन वस्तू विकत घेतल्या जातात. सगळीकडे उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं. घरोघरी फराळ बनवले जातात आणि लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत फटाके फोडून सगळेच हा सण उत्साहात साजरा करतात. अशाचप्रकारे दिवाळी आणि साफसफाईचं खूप जुनं नातं आहे. दिवाळी जवळ आली की साफसफाई करण्यासाठी प्रत्येकाच्या घरी लगबग सुरू असते. एखादा सुट्टीचा दिवस मिळाला की घरातले प्रत्येक जण साफसफाई करण्याची जणू मोहीमच हातात घेतात. प्रत्येकाची, आई, बायको या साफसफाईच्या मोहिमेत अगदी बारकाईने लक्ष घालतात.

घरातली करती स्त्री, म्हणजेच आई मुलांना, नवऱ्याला हाताशी घेऊन साफसफाईची मोहिमच जणू फत्ते करते. पण जर हीच साफसफाई करताना तुम्ही आई-वडिलांपासून लपवलेल्या वस्तू समोर आल्या तर…. हे ऐकूनच घाम फुटला ना. सध्या याचीच आठवून करून देणारा एक पोस्टर बॉय चर्चेत आहे. याने सगळ्यांनाच एका महत्त्वाच्या गोष्टीची आठवण करून दिलीय. या पोस्टर बॉयची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतेय.

हेही वाचा… त्याची चूक काय? रस्त्यावर झोपलेल्या माणसाला आधी काठीने मारलं मग…, धक्कादायक VIDEO होतोय व्हायरल

सोशल मीडियावर दररोज लाखो फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. यात अनेकदा पुणेरी पाट्या चर्चेत असतात. तर कधी पोस्टर बॉय चर्चेत असतात. सध्या अशीच एक मजेशीर पण महत्त्वाची गोष्ट या पोस्टर बॉयने सांगितली आहे. या पोस्टर बॉयचं नेमक काय म्हणणं आहे ते बघूया…

पाटी होतेय व्हायरल

या पोस्टर बॉय सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तो लाल रंगाचं टी-शर्ट घालून तसंच गॉगल घालून एक पाटी घेऊन उभा आहे. “दिवाळीची साफसफाई सुरू होणार आहे, घरात एखादी वस्तू लपवली असेल तर आधीच काढून ठेवा नाहीतर घराच्याआधी तुमची साफसफाई होईल.” असं या पाटीवर लिहिलं आहे.

हा फोटो @maze.pune या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या फोटाला तब्बल १३ लाखांपेक्षा जास्त लाईक्स आले आहेत.

हेही वाचा… तिने त्याच्याबरोबर रेस्टॉरंटमध्ये केलं ‘असं’ काही की दोघांना पडलं महागात, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचा हा VIDEO होतोय VIRAL

युजर्सच्या प्रतिक्रिया

एका युजरने कमेंट करत लिहिलं, “धन्यवाद भाऊ, लवकर आठवण दिली… मी तर विसरलो होतो” तर दुसऱ्याने “भावा आमची साफसपाई दसऱ्यालाच झाली” अशी कमेंट केली. “सावधान राहा सतर्क रहा, भाऊ समाज जागृती करत आहे” अशीही कमेंट एकाने केली.