Puneri pati video viral: पुणेकर त्यांच्या वैशिष्टपूर्ण तिरकस स्वभावासाठी नेहमी ओळखले जातात.‘तुम्हाला प्रत्येक विषयात स्वत:चे मत नसेल तर येथे प्रवेश नाही’ अशा इशार्‍यापासून ते ‘पगडीखालची खरी बुद्धिमत्ता काय असते हे पाहायचंय?’ असे आव्हान फक्त एकाच शहरात दिले जाऊ शकते, ते म्हणजे पुणे. कमीत कमी शब्दांत समोरच्याचा जास्तीत जास्त अपमान करण्याची कला पुणेकरांनाच साधली आहे, असे म्हणतात. त्यात पुणेकरांच्या पुणेरी पाट्या ह्या नेहमी चर्चेच्या विषय ठरतात. पुणेरी किस्से आणि पुणेरी पाट्या जगजाहीर आहेत. अशाच एका पुणेरी पाटीची चर्चा सध्या सगळीकडे जोरात सुरू आहे. कुणाच्याही नादाला लागा पण पुणेकरांच्या नादाला लागू नका असं म्हंटलं जातं. याचीच प्रचिती देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नो पार्किंगमध्ये गाडी लावणं महागात पडलं

Shocking video Bride's Mother Cancels Wedding In Bengaluru After Groom's Drunken Misbehaviour video
VIDEO: “लेकीपेक्षा महत्त्वाचं काहीच नाही” लग्नात दारु पिऊन पोहोचला नवरदेव; नवरीच्या आईनं भर मांडवात काय केलं पाहा
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
shocking Video : Grandfather saves grandchild
Video : म्हणूनच घरात आजी-आजोबा असावेत! हिटरला हात लावायला गेला नातू, आजोबा धावत आले अन्… व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
Horrible incident at the Kaziranga National Park in Assam shocking video
VIDEO: मृत्यू समोर दिसतो तेव्हा…समोर २ गेंडे अन् अचानक जिपमधून मायलेकी खाली पडल्या; जंगलातला थरारक शेवट आला समोर
farewell ceremony shocking video
हे घडवणार उद्याचं भविष्य! शाळेच्या फेअरवेल पार्टीत विद्यार्थ्यांची कारबरोबर जीवघेणी स्टंटबाजी अन् हवेत गोळीबार; थरारक VIDEO Viral
pune fc road video : a puneri boy amazing suggestion to youngsters
Video : “मित्रा, यावर्षी तरी तिच्या इच्छा पूर्ण करण्याऐवजी …” पुणेकर तरुणाने दिला लाखमोलाचा संदेश, पुणेरी पाटी होतेय व्हायरल
Shocking video truck accident video instead of helping him some people started lotting his mobile money
माणुसकी मेली..! अपघातानंतर ट्रक ड्रायव्हर वेदनेनं ओरडत होता अन् लोकांनी काय केलं पाहा; VIDEO पाहून धक्का बसेल
Heartwarming video
“बापाला लेकीचं कौतुक जरा जास्तच असतं..” मुलीचे मोठ्या आवडीने फोटो काढत होते वडील, VIDEO होतोय व्हायरल

पुणेरी पाटय़ा म्हणजे पुणेकरांसाठी अभिमानाचा वारसा. केवळ बुद्धिमत्ता नाही तर खास पुणेरी तैलबुद्धीतून पाटय़ांच्या माध्यमातून पुणेकरांचा स्पष्टवक्तेपणा आणि थेट भिडण्याची वृत्ती झळकते. आपण अनेकदा पाहिलं असेल खास करुन पुण्यात घराबाहेर वेगवेगळ्या पाट्या लावलेल्या असतात, अशीच एक पाटी पुण्यात एका घराबाहेर लावली होती. या पाटीवर गेटसमोर गाडी पार्क करु नका, असे केल्यास टायरमधली हवा काढण्यात येईल. असं लिहलं होतं. मात्र एका हुशार व्यक्तीने ही पाटी हलक्यात घेतली आणि त्याला पुणेकर आजोबांनी चांगलीच अद्दल घडवली. नो पार्किंगमध्ये गाडी लावणं या व्यक्तीला चांगलंच महागात पडलं असून या आजोबांनी काय केलं हे पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल.

गाडी नो पार्किंगमध्ये लागली, की ती ‘टो’ होण्याची भीती असतेच. पण आपल्याकडे अनेकजण या भीतीच्या पलिकडे गेले आहेत. वारंवार सांगूनही बेशिस्तपणे गाड्या पार्क करण्याचे प्रताप आपल्या आजूबाजूला होताना सहज दिसतील. त्यासाठी फार शोधाशोध करण्याची गरज नाही. बेशिस्त पार्किंग करणाऱ्यांना आवरण्यासाठी काहीतरी करायला तर हवं! फक्त गाडी ‘टो’ करुन, दंडांच्या पावत्या फाडून बेशिस्त पार्किग करणारे ताळावर येण्याची शक्यता कधीचीच संपुष्टात आली आहे. अशावेळी काहीतरी नवं करण्याची गरज आहे. हेच या पुणेरी आजोबांनी केलं, त्यांनी थेट गाडीची हवाच काढलीय. या व्हिडीओमध्ये दिसत आहे, हे आजोबा गाडीच्या टायरमधली हवा काढताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> धबधब्यावरची मस्ती नडली; तीन मित्र एक दगड अन् पाण्याचा प्रचंड वेग; रेस्क्यूचा थरारक VIDEO पाहून झोप उडेल

व्हिडीओमधील कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार ही घटना पुण्यातील सदाशिव पेठ या ठिकाणी घडली आहे. दरम्यान जवळच उभ्या असलेल्या कुणा व्यक्तीनं आजोबांची ही कृती आपल्या कॅमेऱ्यात टीपली आणि आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Story img Loader