Puneri pati: पुणेकर त्यांच्या वैशिष्टपूर्ण तिरकस स्वभावासाठी नेहमी ओळखले जातात. त्यात पुणेकरांच्या पुणेरी पाट्या ह्या नेहमी चर्चेच्या विषय ठरतात. पुणे म्हटलं की अर्थात पुणेरी पाट्या लक्षात येतातच. पुणेरी पाट्या या अनेकदा चर्चेचा विषय बनतात. कधी वाद तयार करतात तर कधी वादावर भाष्य करतात. कधी चांगला संदेश देतात तर कधी चांगलाच संदेश पोहोचवतात. अशीच एक पुणेरी पाटी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बिना व्यक्त होता आपली मतं ठामपणे आणि थेट मांडण्याचं पुणेकरांचं माध्यम म्हणजे पुणेरी पाटी. पुणेरी किस्से आणि पुणेरी पाट्या जगजाहीर आहेत. अशाच एका पुणेरी पाटीची चर्चा सध्या सगळीकडे जोरात सुरू आहे.

पुण्यात पार्लरबाहेर लावलेली एक पाटी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही पाटी वाचून तुम्हीही पोटधरून हसाल.मेकअप हा महिलांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सुंदर दिसण्यासाठी महिला मेकअप करतात. यासाठी महिला या ब्युटी पार्लरमध्ये जातात. ब्युटी पार्लर हा आजकालचा एक ट्रेडिंग व्यवसाय झालेला आहे. दरम्यान पुण्यातल्या अशाच एका पार्लरच्या बाहेर चक्क मुलांसाठी पाटी लावण्यात आली आहे. ही पाटी आता चर्चेचा विषय बनली आहे.

Pune road rage video goes viral 2 youth drive bike wrongly in front of ST bus watch video viral on social media
VIDEO: एवढी हिम्मत येतेच कुठून? पुण्यात एसटीसमोर तरुणांनी ओलांडली मार्यादा; बोला पुणेकर काय केलं पाहिजे यांचं?
Sharad pawar on ladki bahin scheme
मविआ सत्तेत आल्यावर लाडकी बहीण योजना बंद करणार?…
Meet who is MBBS Dr Pinki Haryana
Who is Pinki Haryan : इच्छा तिथे मार्ग! भिक्षा मागणारी मुलगी बनली डॉक्टर, झोपडपट्टीत राहिलेल्या पिंकीची यशोगाथा तुम्हालाही देईल प्रेरणा!
korpana city youth congress marathi news
बलात्कार प्रकरणातील आरोपीचा मुंबईला पळून जाण्याचा प्रयत्न, पोलिसांनी अकोल्यात ठोकल्या बेड्या
After Puneri Grandmother Now Puneri Grandfather Video Viral Grandpa did a wonderful dance on the song Kathi Na Ghongda Gheu Dya Ki Ra
पुणेरी आजीनंतर आता पुणेरी आजोबांचा Video Viral! “काठी न घोंगड घेऊ द्या की रं” गाण्यावर आजोबांनी केला भन्नाट डान्स
college youth who went for vacation with friend brutally beaten and robbed in Baner hill area
बाणेर टेकडीवर तरुणाला लुटले
Puneri pati on Doorbell goes viral on social media funny puneri pati
PHOTO: पुणेकरांचा नाद नाय! घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी दरवाजावर लावलेली पाटी पाहून पोट धरुन हसाल
no decision has been taken on mechanism to fill pothole in City Post premises after 24 hours
‘खड्ड्यांत’ गेलेल्या पुण्यात खड्डा बुजविण्यावरून ‘खड्डाखड्डी’!

आता तुम्ही म्हणाल असं काय लिहलंय या पाटीवर. तर या पाटीवर “पार्लरच्या बाहेर लावलेली पाटी, आमच्या इथून निघालेल्या सुंदर मुलीला पाहून शिट्टी वाजवू नये. ती तुमची आजी असू शकते” असा मजकूर लिहला आहे. हा फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.

पाहा पुणेरी पाटी

हेही वाचा >> “बाया झायल्या गार गं” साठी ओलांडलेल्या आजीबाईंचा खांद्यावर बसून तुफान डान्स; VIDEO झाला व्हायरल

पुणेरी पाट्या म्हणजे पुणेकरांसाठी अभिमानाचा वारसा

‘तुम्हाला प्रत्येक विषयात स्वत:चे मत नसेल तर येथे प्रवेश नाही’, अशा इशार्‍यापासून ते ‘पगडीखालची खरी बुद्धिमत्ता काय असते हे पाहायचंय?’ असे आव्हान फक्त एकाच शहरात दिले जाऊ शकते, ते म्हणजे पुणे. सुरुवातीला पेठांमध्येच असलेली पुणेरी पाटी शहर पसरले तशी संपूर्ण पुण्यात पसरली. कमीत कमी शब्दांत समोरच्याचा जास्तीत जास्त अपमान करण्याची कला पुणेकरांनाच साधली आहे असे म्हणतात. त्याचप्रमाणे कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त खवचट आशय व्यक्त करणारी पुणेरी पाटीही कोणी येरा गबाळा बनवू शकत नाही. पुणेरी पाट्या म्हणजे पुणेकरांसाठी अभिमानाचा वारसा. केवळ बुद्धिमत्ता नाही तर खास पुणेरी बुद्धीतून पाट्यांच्या माध्यमातून पुणेकरांचा स्पष्टवक्तेपणा आणि थेट भिडण्याची वृत्ती झळकते.