Viral Photo: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. पूर्वी सोशल मीडियावर पुणेरी पाट्यांची खूप चर्चा असायची. त्यावरील विनोदी आशय नेहमी व्हायरल व्हायचे. परंतु, अलीकडे शाळेतील मुलांच्या पेपरातील उत्तरं, गाड्यांच्या मागचे हटके डायलॉग, जाहिरातींवरील आशयही तितकेच चर्चेत असतात. दरम्यान, आता अशाच एका पाटीचा फोटो व्हायरल होतोय ज्यावर असं काहीतरी लिहिलंय जे वाचून तुम्हालाही हसू येईल.
आतापर्यंत सोशल मीडियावर अनेक पाट्यांचे फोटो व्हायरल झाले आहेत; ज्यात नेहमी अतरंगी पद्धतीने सामाजिक संदेश देणारी वाक्य लिहिलेली असतात. पण सध्या व्हायरल होत असलेल्या पाटीवर लिहिलेली वाक्य ही पर्यटकांना धमकी देण्यासाठी लिहिली असल्याचे दिसत आहे.
या व्हायरल फोटोमध्ये दिसणारा फलक इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (ITBP) आणि बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) यांनी रस्त्यावर लावलेला आहे. कारण या परिसरातील रस्ते सामान्य नागरिकांसाठी खुले केल्यानंतर अनेकजण येथील नियमांचे पालन करत नाहीत. त्यामुळे या पाटीवर धमकी वजा इशारा देण्यात आला आहे. या व्हायरल फोटोतील पाटीवर “जितने रुल्स टूटेंगे, उटनी हड्डियाँ टुटेंगी” म्हणजे तुम्ही जेवढे नियम तोडाल, तेवढी तुमची हाडे तुटतील. असं लिहिण्यात आलं आहे. या पाटीचा फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
हा फोटो X(ट्वीटर ) वरील @Wellu या अकाउन्टवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत एक लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत. तर हजारो लाइक्सही मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना देखील दिसत आहेत. यातील एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, “लोक ऐकत नाहीत, त्यामुळे असं काहीतरी करायलाच हवं”, तर दुसऱ्या एकाने लिहिलंय की, “सावधान राहा, सतर्क राहा.”, तर बरेच जण यावर हसताना दिसत आहेत.
पाहा फोटो:
दरम्यान, नुकत्याच काही दिवसांपूर्वी एका मुलाने देखील अशीच एक लग्नासाठी एक जाहिरात दिली होती; ज्याचे रस्त्यावर फोटोदेखील लावण्यात आले होते. या फोटोची खूप चर्चा रंगली होती. तसेच एका मंगल कार्यालयाच्या जाहिरातीचा देखील फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता.