Puneri Pati Funny Photo : पुणेकर त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. टोचून, टोमण्याने पण खरं बोलणं हा पुणेकरांचा स्वभाव आहे. पुणेकरांच्या स्वभावाप्रमाणे तिथल्या पुणेरी पाट्यादेखील नेहमी चर्चेचा विषय ठरतात. कारण त्यावर लोकांसाठी सूचनाच इतक्या भन्नाट पद्धतीने लिहिलेल्या असतात की येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाचे त्या लक्ष वेधून घेतात. काहीवेळा या पाट्यांमधून लोकांना टोचलीत, पण समजतीलही अशा सूचना लिहिल्या जातात. अगदी पार्किंग, दूधवाल्यासाठी ते हॉटेल्समध्ये ग्राहकांसाठी अशा अनेक छोट्या-छोट्या गोष्टींसाठी पुणेकर सूचनांची पाटी लावतात. सध्या अशीच एक पुणेरी पाटी सोशल मीडियावर चर्चेत आली आहे, ज्यामधून पुण्यातील सदाशिव पेठेतील एक पुणेरी वडापाव विक्रेत्याने लोकांना भन्नाट सूचना केली आहे, जी वाचून तुम्हाला हसू आवरणे अवघड होईल.

तुम्ही पुण्यात कधी फिरायला गेलात तर तुम्हाला अनेक हॉटेल्सबाहेर, दुकानांबाहेर भन्नाट मेसेजच्या पाट्या पाहायला मिळतात. या पाट्यांमधून एकतर लोकांना खोचकपणे सूचना दिल्या जातात किंवा काही गोष्टींविषयी माहिती दिली जाते. या व्हायरल पाटीतून एका वडापाव विक्रेत्याने ग्राहकांना खोचकपणे सूचना केली आहे.

father protecting children from mother anger
‘आईच्या जाचातून बाबांनी वाचवलं…’ मुलांना मार पडू नये म्हणून वडिलांनी केलं असं काही…VIDEO पाहून युजर्स करतायत कौतुक
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Viral Video
Viral Video : प्रियकराबरोबर कारमध्ये दिसली बायको! नवऱ्याने थेट कारच्या बोनेटवर मारली उडी, एक किमीपर्यंत नेलं फरपटत
Protest Against Corrupted officer in gujarat
Video: सरकारी अधिकाऱ्यावर नोटांची उधळण; भ्रष्ट अधिकाऱ्याचा लोकांनी माज उतरवला, व्हिडीओ व्हायरल
Narayangaon Pune Accident 9 people died
Narayangaon Pune Accident : पुण्यातील नारायणगाव येथे ट्रकने कारला उडवले, ९ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या वारसांना मदत जाहीर
Rajasthan dowry Case Woman Suicide
“माझ्या सासूला बेड्यांची हौस, तिला…”, व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस ठेवून महिलेची आत्महत्या; म्हणाली, “माझा सासरा आणि नणंद”
Uday Samant On Thackeray group
Uday Samant : उद्धव ठाकरेंना धक्का बसणार? शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “पुढच्या आठ दिवसांत ठाकरे गटातून…”
Gopan Swami Samadhi
Gopan Swami Samadhi : समाधी घेतल्याचा कुटुंबीयांचा दावा, शेजाऱ्यांना खुनाचा संशय; पोलिसांनी कबर खोदली अन् समोर आली धक्कादायक माहिती

“ताटामध्ये हात घालून भजी खाऊ नये कारण….”

ही पुणेरी पाटी एका वडापावच्या स्टॉलवर लावली आहे. तुम्ही अशा वडापाव स्टॉल्सवर कृपया पैसे सुट्टे द्या, एक्सट्रा चटणी मागू नये, एक्सट्रा चटणीचे एक्सट्रा पैसे, कचरा डब्ब्यात टाका. मात्र, अशाप्रकारे सरळ भाषेत सांगतील ते पुणेकर कसले. अशाच एका पुणेकर वडापाव विक्रेत्याने लावलेली पाटी व्हायरल होतेय. आता तुम्ही म्हणाल, या पाटीवर असं काय लिहिलं आहे? तर या पाटीवर “ताटामध्ये हात घालून भजी खाऊ नये, कारण अच्छे दिन आले आहेत” असा मजकूर लिहिला आहे, जो वाचून वडापाव विक्रेत्याच्या भजीच्या ताटात हात लावताना ग्राहक विचार करेल.

“पूर्वी काय ५ स्टारचा मालक होता की काय…”, पुणेरी पाटीवर लोकांच्या कमेंट्स

पुणेरी पाटीचा हा फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. ज्यावर युजर्सही वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिले की, “पूर्वी काय ५ स्टारचा मालक होता की काय…”, दुसऱ्या युजरने लिहिले की, “ठिकाण सांगण्याची गरज नाही”, तिसऱ्या युजरने लिहिले की, “मास्क घालून भजी घावी, कारण तो (करोना) येतोय. मी पुन्हा येईन, पुन्हा येईन व्हायरल…”, अशाप्रकारे नेटकऱ्यांनीही या व्हायरल पाटीला चांगलीच दाद दिली आहे.

VIDEO : “ऐ राजू, हम ढूंढ रहे है रे बाबू…”, महाकुंभ मेळ्यात हरवलेल्या लोकांसाठी होतायत अशा घोषणा की, ऐकून पोट धरून हसाल

दरम्यान, सुरुवातीला पुण्यातील पेठ्यांमध्येच अशा पुणेरी पाट्या पाहायला मिळायच्या; पण नंतर संपूर्ण पुण्यात या पाट्या प्रसिद्ध झाल्या. या पाट्यांमधून कमीत कमी शब्दांत समोरच्याचा जास्तीत जास्त अपमान करण्याची किंवा खोचकपणे समजवण्याची ही कला पुणेकरांनाच चांगली जमली आहे, त्यामुळे पुणेरी पाट्या हा आता पुणेकरांसाठी गर्वाचा विषय आहे. यातून पुणेकरांची थेट बोलण्याची आणि समोरच्याला कमी शब्दात गप्प करण्याची कला दिसून येते.

Story img Loader