Puneri pati: पुणेकर त्यांच्या वैशिष्टपूर्ण तिरकस स्वभावासाठी नेहमी ओळखले जातात. त्यात पुणेकरांच्या पुणेरी पाट्या ह्या नेहमी चर्चेच्या विषय ठरतात. पुणे म्हटलं की अर्थात पुणेरी पाट्या लक्षात येतातच. पुणेरी पाट्या या अनेकदा चर्चेचा विषय बनतात. कधी वाद तयार करतात तर कधी वादावर भाष्य करतात. कधी चांगला संदेश देतात तर कधी चांगलाच संदेश पोहोचवतात. अशीच एक पुणेरी पाटी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बिना व्यक्त होता आपली मतं ठामपणे आणि थेट मांडण्याचं पुणेकरांचं माध्यम म्हणजे पुणेरी पाटी. एरवी टोमणे आणि अपमान करणारी ही पाटी यावेळी एक चांगला संदेश घेऊन आली आहे. ही पाटी तुम्हालाही नक्कीच विचार करायला भाग पाडेल.

पुणेकर त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण तिरकस स्वभावासाठी नेहमी ओळखले जातात. त्यात पुणेकरांच्या पुणेरी पाट्या ह्या नेहमी चर्चेच्या विषय ठरतात. पुणेरी किस्से आणि पुणेरी पाट्या जगजाहीर आहेत. अशाच एका पुणेरी पाटीची चर्चा सध्या सगळीकडे जोरात सुरू आहे. एक पाटी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही पाटी वाचून तुम्हीही कौतुक कराल.

When The teacher asked students for homework students told hilarious reason
“गृहपाठ का केला नाही?” विद्यार्थ्यांनी दिलेली कारणं ऐकून आठवेल तुम्हाला तुमचे शाळेचे दिवस, मजेशीर VIDEO व्हायरल
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Deepika Padukone And Ranveer Singh Spotted with baby dua after delivery video viral
Video: पहिल्यांदाच लाडक्या लेकीबरोबर दिसले दीपिका पादुकोण अन् रणवीर सिंह, एअरपोर्टवरील व्हिडीओ होतोय व्हायरल
himachal pradesh cm sukhvinder singh sukhu
मुख्यमंत्र्यांसाठीचे सामोसे खाल्ले कुणी? CID करतेय चौकशी; राज्यभर त्याचीच चर्चा!
Couple dance video husband wife dance in wedding on marathi song
VIDEO: आयुष्य खूप सुंदर आहे फक्त नवरा हौशी पाहिजे! नवरा बायकोनं असा डान्स केला की सगळे नातेवाईक पाहतच राहिले
Vivek Phansalkar has additional charge of the post of Director General
मुंबई : विवेक फणसळकर यांच्याकडे महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार
uddhav thackeray fact check video
“मी गोमांस खातो, काय माझं वाकडं करायचं ते करा” उद्धव ठाकरेंनी दिली जाहीर कबुली? या खोट्या VIDEO ची खरी बाजू पाहा
Manoj Sangole or Buddham Raut who is the official BSP candidate for the assembly elections 
अरेच्चा! पक्ष एक अन् उमेदवार दोन; आता पुढे काय?

आता तुम्ही म्हणाल या पाटीवर असं लिहलंय तरी काय? तर या पाटीवर “या दोन गोष्टीमुळे जग तुम्हाला ओळखते. १ – तुमच्याजवळ काहीच नसताना तुम्ही बाळगलेला संयम. २ – तुमच्याजवळ सर्वकाही असतानाही तुम्ही दाखवलेला नम्रपणा” असं लिहलं आहे. तर पोस्टच्या कॅप्शनमध्ये, आयुष्यात संयमी असणं खूप गरजेचं असतं. कोणामुळे आपल्याला त्रास दुःख वेदना झाल्या असतील तर आपण रागात काहीही न बोलता नम्रपणे संयमाने ती परिस्थिती हाताळली पाहिजे. लोकं येतील जातील अडचणी येतील जातील पण त्या वेळात तूम्ही दाखवलेला नम्रपणा आणि तुमचा संयमी राहण्याचा प्रयत्न नेहमीच तुम्हाला योग्य मार्गावर घेऊन येतो. आपल्या हाताने काही करण्यापेक्षा कर्मावर विश्वास ठेवावा. कारण कर्म त्यांना त्यांचे फळ देते या चक्रातून कोणीही वाचू शकत नाही. तुमचे चांगले वागणे लोकांना आवडत नसले तरी कर्माच्या पुस्तकात त्याची नोंद चांगलीच होते. अस कॅप्शन लिहलं आहे.

पाहा पाटी

हेही वाचा >> “नवऱ्याला दृष्टी नाही, माहित होतं तरीही लग्न केलं”; ठाण्यातील आज्जी आजोबांनी सांगितला प्रेमाचा खरा अर्थ, Video एकदा पाहाच

पुणेरी पाट्या म्हणजे पुणेकरांसाठी अभिमानाचा वारसा

‘तुम्हाला प्रत्येक विषयात स्वत:चे मत नसेल तर येथे प्रवेश नाही’, अशा इशार्‍यापासून ते ‘पगडीखालची खरी बुद्धिमत्ता काय असते हे पाहायचंय?’ असे आव्हान फक्त एकाच शहरात दिले जाऊ शकते, ते म्हणजे पुणे. सुरुवातीला पेठांमध्येच असलेली पुणेरी पाटी शहर पसरले तशी संपूर्ण पुण्यात पसरली. कमीत कमी शब्दांत समोरच्याचा जास्तीत जास्त अपमान करण्याची कला पुणेकरांनाच साधली आहे असे म्हणतात. त्याचप्रमाणे कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त खवचट आशय व्यक्त करणारी पुणेरी पाटीही कोणी येरा गबाळा बनवू शकत नाही. पुणेरी पाट्या म्हणजे पुणेकरांसाठी अभिमानाचा वारसा. केवळ बुद्धिमत्ता नाही तर खास पुणेरी बुद्धीतून पाट्यांच्या माध्यमातून पुणेकरांचा स्पष्टवक्तेपणा आणि थेट भिडण्याची वृत्ती झळकते.

Story img Loader