Puneri Patya : पुण्यात पुणेरी पाट्या पाहिल्या नसतील असा क्वचितच एखादा व्यक्ती भेटेल. पुणे आणि पुणेरी पाट्याचे घनिष्ठ नाते आहेत. पुणेरी पाट्या म्हणजे कमीत कमी शब्दांत विनोदी पद्धतीने सूचना दिल्या जातात. सोशल मीडियावर अनेक पुणेरी पाट्यांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही पाट्या मजेशीर असतात तर काही पाट्या थक्क करणाऱ्या असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये असंख्य अशा एकापेक्षा एक पुणेरी पाट्या दाखवल्या आहेत. व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.
व्हिडीओत दाखवलेल्या पुणेरी पाट्या –
- दोघात मिसळ खाल्ल्यास जसे प्रेम वाढते तसेच ३० रुपये एक्स्ट्रा वाढतील.
- या दरवाज्यातून प्रवेश करणाऱ्या व्यक्ती डॉक्टरांना आवडत नाही.
- मतदार दुपारी झोपेत असतात. बेल वाजवू नये. अन्यथा मत मिळणार नाही (आणि काळजी करू नये आमचे मत तुम्हालाच आहे)
- येथे वाडा पाडून बिल्डींग बांधायची नाही. असे आधीच ठरले आहे. तेव्हा असा प्रस्ताव घेऊन कोणीही आल्यास त्याला वाड्यातच कोंडून पोकळ बांबूचे फटके देण्यात येतील. – हुकुमावरून-
- आमच्या मुलाचे लग्न आता ठरले आहे कृपया स्थळे आणू नयेत.
हेही वाचा : Pune : आठवणीतले पुणे! जुन्या PMT ने तुम्ही कधी प्रवास केला का? VIDEO व्हायरल
- ग्रीन टीमुळे वजन कमी होते जेव्हा तुम्ही स्वत:डोंगरावर जाऊन पाने तोडून आणता तेव्हाच
- आरे मी गाढव आहे गेट समोर लावतोय गाडी – No parking
- शहाण्या कुत्र्यांला वेड्या माणसाने मंदिर व गार्डन परिसरात कृपया आणू नये.
- पत्ता विचारायचे पैसे पडतील. पत्ता १० किमी असेल तर ५० पैसे, १० किमीच्या बाहेर असेल तर १-०० रुपये धन्यवाद.असे का लिहिले आहे हे विचारायचे २००० रुपये पडतील ज्याला वाचता येत नाही त्याला फूकट पत्ता सांगितला जाईल.
- मी पुणेकर! सिगारेट बशीमध्ये विझवू नये नाहीतर चहा अॅशट्रे मध्ये प्यावा लागेल.
- आम्ही रस्त्यात मुक्काम करत नाही. कृपया हॉर्न वाजवू नये. आपला नम्र पुणेकर
पाहा व्हायरल व्हिडीओ
हेही वाचा : आनंद महिंद्रा ‘कळसूबाई’च्या प्रेमात; विलोभनीय VIDEO पोस्ट करीत म्हणाले, “वेळ काढा आणि…”
_punethings या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पुणेरी पाट्या” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “आम्ही पुणेरी” तर एका युजरने लिहिलेय, “जगात भारी आपले पुणे” आणखी एका युजरने लिहिलेय, “पुणे तिथे काय उणे”