Puneri pati: पुणे म्हटलं की पुणेरी पाट्या लक्षात येतातच. पुणेरी पाट्या या अनेकदा चर्चेचा विषय बनतात. कधी वाद तयार करतात तर कधी वादावर भाष्य करतात. कधी चांगला संदेश देतात तर कधी चांगलाच संदेश पोहोचवतात. अशीच एक पुणेरी पाटी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.बिना व्यक्त होता आपली मतं ठामपणे आणि थेट मांडण्याचं पुणेकरांच माध्यम म्हणजे पुणेरी पाटी. पुणेकर त्यांच्या वैशिष्टपूर्ण तिरकस स्वभावासाठी नेहमी ओळखले जातात. त्यात पुणेकरांच्या पुणेरी पाट्या ह्या नेहमी चर्चेच्या विषय ठरतात. पुणेरी किस्से आणि पुणेरी पाट्या जगजाहीर आहेत. अशाच एका पुणेरी पाटीची चर्चा सध्या सगळीकडे जोरात सुरू आहे. एक पाटी सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. ही पाटी वाचून तुम्हीही पोट धरुन हसाल.

लूटमारीच्या, चोरीच्या गुन्ह्यांची संख्या वाढतच चालली आहे. चोर चोरी करण्यासाठी नवनवीन आयडीया घेऊन येत असतात. कितीही चलाख चोर असुदेत पोलीस चोराला शोधून काढतातच. तरीही चोऱ्यांचे प्रमाण काही कमी होत नाही. अशातच चोर बंद असलेल्या घरावरही लक्ष ठेवून असतात. मात्र एका पुणेकरानं बंद असलेल्या आपल्या बंगल्याबाहेर एक पाटी लावली आहे. ही पाटी वाचून कोणीही या बंगल्यात जाण्याचा विचार करणार नाही. ही पाटी वाचून तुम्हीही पोट धरुन हसाल.

Anand Hendre created a world cup scene for Ganeshotsav
असा देखावा पाहिलाच नसेल! १५ फूट ऊंच बॅट, वर्ल्ड कपची ट्रॉफी आणि भल्या मोठ्या चेंडूत गणपती बाप्पा
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
nagpur hit and run case police revealed sanket bawankule was in the car
संकेत बावनकुळे कारमध्ये असल्याचे उघड ; नागपूर ‘हिट अँड रन’ प्रकरणी पोलिसांची माहिती
Vrindavan dekhava in pune
Pune Video : वृंदावन आलंय आपल्या पुण्यात! तुम्ही पाहिला का हा सुंदर देखावा, VIDEO एकदा पाहाच
Bhagyashree Atram daughter of Minister Dharma Rao Baba Atram to join Sharad Pawar faction
गडचिरोली : धर्मरावबाबा आत्राम कुटुंबातील बंडावर शिक्कामोर्तब; भाग्यश्री आत्राम १२ सप्टेंबरला…
nagpur boy murder elder brother dispute over alcohol
नागपूर : मध्यरात्री केला मेसेज, प्रेयसीची भेट अन् हत्याकांड…
ladki sunbai yojana | pune Baramati banner goes viral
लाडकी सुनबाई योजना! सासुबाईच्या जेवणावर सुनबाईचे जेवण फ्री, बारामतीचे बॅनर चर्चेत, Photo एकदा पाहाच
pcmc set up library in slums with collaboration of ngo
झोपडपट्ट्यांमध्ये अभ्यासिका; पिंपरी महापालिकेचा उपक्रम

आता तुम्ही म्हणाल असं लिहलंय तरी काय? तर या बंगल्याबाहेर लावलेल्या पाटीवर “बंगला रिकामा आहे, चोरण्यासारखे काहीही नाही. विनाकारण कष्ट घेऊ नयेत.”

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “आज पाहिलेली सगळ्यात भारी पुणेरी पाटी” रिक्षामागची पाटी पाहून व्हाल भावूक; पुण्यातला VIDEO व्हायरल

‘तुम्हाला प्रत्येक विषयात स्वत:चे मत नसेल तर येथे प्रवेश नाही’ अशा इशार्‍यापासून ते ‘पगडीखालची खरी बुद्धिमत्ता काय असते हे पाहायचंय?’ असे आव्हान फक्त एकाच शहरात दिले जाऊ शकते, ते म्हणजे पुणे. सुरुवातीला पेठांमध्येच असलेली पुणेरी पाटी शहर पसरले तशी संपूर्ण पुण्यात पसरली.कमीत कमी शब्दांत समोरच्याचा जास्तीत जास्त अपमान करण्याची कला पुणेकरांनाच साधली आहे, असे म्हणतात. त्याचप्रमाणे कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त खवचट आशय व्यक्त करणारी पुणेरी पाटीही कोणी येरा गबाळा बनवू शकत नाही.पुणेरी पाटय़ा म्हणजे पुणेकरांसाठी अभिमानाचा वारसा. केवळ बुद्धिमत्ता नाही तर खास पुणेरी तैलबुद्धीतून पाटय़ांच्या माध्यमातून पुणेकरांचा स्पष्टवक्तेपणा आणि थेट भिडण्याची वृत्ती झळकते.