Viral video: पुणेकर त्यांच्या वैशिष्टपूर्ण तिरकस स्वभावासाठी नेहमी ओळखले जातात. त्यात पुणेकरांच्या पुणेरी पाट्या ह्या नेहमी चर्चेच्या विषय ठरतात. पुणेरी किस्से आणि पुणेरी पाट्या जगजाहीर आहेत. अशाच एका पुणेरी पाटीची चर्चा सध्या सगळीकडे जोरात सुरू आहे.एक पाटी सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. मात्र यावेळी पुणेकरांनी या पाटीवर कुणाचा अपमान नाही केला तर तरुणाईला खरंच एक संदेश देण्याचा प्रयत्न केलाय. एरवी पुण्याबाहेरची पुणेकरांना नाव ठेवणारी लोकंही या पाटीचं कौतुक करत आहेत. तुम्हीच पाहा आता ही पाटी..पाही पाटी पाहून म्हणाल आतापर्यंतची सगळ्यात भारी पुणेरी पाटी…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, या पाटीवर “वास्तव आणि खरा आनंद देणारं जग यांच्याशिवाय आहे. म्हणजेच पुढे पाटीवर व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम, फेसबूक, ट्विटर यांसारख्या सोशल मीडिया अॅपचे लोगो लावले आहेत. त्यापुढे पाटीवर टाळी द्या, मिठी मारा, मदत करा. समक्ष भेटण्याचा आनंद घ्या. असा मजकूर लिहला आहे.

आपण प्रत्येक जण सोशल मीडियाच्या इतक्या आहारी गेलो आहे की त्याच्या बाहेरच्या जागाचा आपल्याला विसर पडला आहे. अलीकडची तरूणाई तर सोशल मीडियावर तुटून पडलेली असते. सोशल मीडियाचे काही फायदेही आहेत, परंतु त्याचबरोबर सोशल मीडियाचा वापर फसवणूक, बनावटगिरी आणि लैंगिक छळासाठीही होत असल्याचे दिसून येत आहे. अक्षरश: सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सोशल मीडियावर तुटून पडलेली असते. परंतु म्हणतात ना, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करणं हे वाईटच…सोशल मीडियाचा अतिवापर ही आजकालच्या तरूणाईपुढची प्रमुख समस्या बनली आहे. त्यामुळे वेळीच याच्या वापरावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> अलिबाग ते दुबई; नलिनी मुंबईकर दुबईकरांना चाखवणार अस्सल कोळी पकवान्नांची चव, VIDEO एकदा पाहाच

‘तुम्हाला प्रत्येक विषयात स्वत:चे मत नसेल तर येथे प्रवेश नाही’ अशा इशार्‍यापासून ते ‘पगडीखालची खरी बुद्धिमत्ता काय असते हे पाहायचंय?’ असे आव्हान फक्त एकाच शहरात दिले जाऊ शकते, ते म्हणजे पुणे. सुरुवातीला पेठांमध्येच असलेली पुणेरी पाटी शहर पसरले तशी संपूर्ण पुण्यात पसरली.कमीत कमी शब्दांत समोरच्याचा जास्तीत जास्त अपमान करण्याची कला पुणेकरांनाच साधली आहे, असे म्हणतात. त्याचप्रमाणे कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त खवचट आशय व्यक्त करणारी पुणेरी पाटीही कोणी येरा गबाळा बनवू शकत नाही.पुणेरी पाटय़ा म्हणजे पुणेकरांसाठी अभिमानाचा वारसा. केवळ बुद्धिमत्ता नाही तर खास पुणेरी तैलबुद्धीतून पाटय़ांच्या माध्यमातून पुणेकरांचा स्पष्टवक्तेपणा आणि थेट भिडण्याची वृत्ती झळकते.