Puneri pati viral: पुणे म्हटलं की पुणेरी पाट्या लक्षात येतातच. पुणेरी पाट्या या अनेकदा चर्चेचा विषय बनतात. कधी वाद तयार करतात तर कधी वादावर भाष्य करतात. कधी चांगला संदेश देतात तर कधी चांगलाच संदेश पोहोचवतात. अशीच एक पुणेरी पाटी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.बिना व्यक्त होता आपली मतं ठामपणे आणि थेट मांडण्याचं पुणेकरांच माध्यम म्हणजे पुणेरी पाटी. पुणेकर त्यांच्या वैशिष्टपूर्ण तिरकस स्वभावासाठी नेहमी ओळखले जातात. त्यात पुणेकरांच्या पुणेरी पाट्या ह्या नेहमी चर्चेच्या विषय ठरतात. पुणेरी किस्से आणि पुणेरी पाट्या जगजाहीर आहेत. अशाच एका पुणेरी पाटीची चर्चा सध्या सगळीकडे जोरात सुरू आहे. एक पाटी सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. ही पाटी वाचून तुम्हीही पोट धरुन हसाल.

पुण्यातल्या जीममधली पाटी व्हायरल

Mercedes-Benz, Supriya Sule, Supriya Sule latest news,
मर्सिडिज बेंझला नोटीस देण्याच्या टायमिंगवर शंका; खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, “शासनाने…”
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा…
student wing agitation
‘वंचित’कडून महाविकास आघाडी समर्थक विचारवंत लक्ष्य
teacher robbed, Solapur, social media,
सोलापूर : समाज माध्यमातून प्रेमाच्या जाळ्यात ओढत शिक्षकाला लुटले
annapoorna issue srinivasan reaction
“झालं ते विसरून पुढं जायला हवं”, ‘त्या’ व्हिडीओवरील वादावर अन्नपूर्णा हॉटेलचे संचालक श्रीनिवासन यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “ज्यांनी…”
Nagpur, Thieves stole donation box Mahal,
साक्षात ‘विघ्नहर्ता’ मंडपात, तरीही चोरट्यांनी साधला डाव
26 bjp activists from chhattisgarh allotted one constituency to win marathwada
मराठवाड्यात भाजपकडून छत्तीसगडमधील कायर्कर्त्यांची कुमक
Kaustubh Pandharipande faces a big challenge of kidney disease
नागपूर : माळरानाच्या संवर्धकासमोर किडनी आजाराचे मोठे आव्हान

ही पाटी कोणत्या घराबाहेर नाही लावली तर जीममध्ये लावली आहे. जीममध्ये पोरं व्यायाम करायला महिन्याच्या सुरुवातील उत्साहात जातात खरं पण हीच मुलं महिन्याच्या शेवटी गायब असतात. सुरुवातीचा उत्साह शेवटपर्यंत फारसा टिकत नाही. याच पार्श्वभूमीवर पुण्याच्या एका जीममधली ही पाटी व्हायरल होत आहे. आता तुम्ही म्हणाल असं काय लिहलंय या पाटीवर? तर या पाटीवर “व्यायाम म्हणजे प्रेम नव्हे, तो करावा लागतो. आपोआप होत नाही.” ही पाटी पाहून जीममध्ये येणारा प्रत्येकजण हसत असणार यात शंका नाही.

ही पोस्ट kirti.killedar नावाच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आली असून युजर्स यावर वेगवेगळ्या मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.

पाहा फोटो

हेही वाचा >> “घाईत घेतलेला निर्णय नंतर पश्चाताप करायलाही वेळ देत नाही” ८ सेकंदचा VIDEO पाहून अंगावर काटा येईल; काय घडलं?

‘तुम्हाला प्रत्येक विषयात स्वत:चे मत नसेल तर येथे प्रवेश नाही’ अशा इशार्‍यापासून ते ‘पगडीखालची खरी बुद्धिमत्ता काय असते हे पाहायचंय?’ असे आव्हान फक्त एकाच शहरात दिले जाऊ शकते, ते म्हणजे पुणे सुरुवातीला पेठांमध्येच असलेली पुणेरी पाटी शहर पसरले तशी संपूर्ण पुण्यात पसरली.कमीत कमी शब्दांत समोरच्याचा जास्तीत जास्त अपमान करण्याची कला पुणेकरांनाच साधली आहे, असे म्हणतात. त्याचप्रमाणे कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त खवचट आशय व्यक्त करणारी पुणेरी पाटीही कोणी येरा गबाळा बनवू शकत नाही.पुणेरी पाटय़ा म्हणजे पुणेकरांसाठी अभिमानाचा वारसा. केवळ बुद्धिमत्ता नाही तर खास पुणेरी तैलबुद्धीतून पाटय़ांच्या माध्यमातून पुणेकरांचा स्पष्टवक्तेपणा आणि थेट भिडण्याची वृत्ती झळकते.