Puneri pati viral: पुणेरी पाट्या हा कायम चर्चेचा विषय असतो. सोशल मीडियात अनेकदा मीम्स म्हणूनही या व्हायरल होतात. या पाट्यातून कधी चिमटा, कधी खोचक टोला तर कधी सडेतोड भूमिकाही मांडलेली पाहायला मिळते. आता पुन्हा एकदा ह्या पुणेरी पाट्या चर्चेत आल्या आहेत.पुण्याच्या लोकांच्या अनेक प्रसिद्ध असलेल्या गोष्टींप्रमाणेच त्यांचे पुणेरी टोमणेही चांगलेच प्रसिद्ध असतात. पुण्यातील लोकांची टोमणे मारण्याची एक खास शैली आहे. त्याचप्रमाणे टोमण्यासाठी त्यांनी केलेली आणखी एक सोय म्हणजे पुणेरी पाट्या. पुणेरी पाट्यांमधून ते एकापेक्षा एक जबरदस्त टोमणे देत असतात. अगदी चपखलपणे एखादी गोष्ट त्या माध्यमातून ते सांगत असतात. सोशल साइट्सवर अशा पुणेरी पाट्या भरपूर शेअर होत असतात. अशीच एक पुणेरी पाटी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी ही पाटी एका बिर्याणीच्या हॉटेलबाहेर लावण्यात आली आहे. ही पाटी वाचून तुम्हीही पोट धरुन हसाल.
पुण्याच्या हॉटेलबाहेर पुणेरी पाटी
पुणेकर त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण तिरकस स्वभावासाठी नेहमी ओळखले जातात. त्यात पुणेकरांच्या पुणेरी पाट्या ह्या नेहमी चर्चेच्या विषय ठरतात. पुणेरी किस्से आणि पुणेरी पाट्या जगजाहीर आहेत. अशाच एका पुणेरी पाटीची चर्चा सध्या सगळीकडे जोरात सुरू आहे.आता तुम्ही म्हणाल या पाटीवर असं काय लिहलं आहे? तर या पाटीवर “बिर्याणी कधीही संपू शकते कोणीही नाराज होऊ नये व मॅनेजमेंटशी वाद घालू नये” असं लिहलं आहे. पुणेकरांनो तुम्ही ही पाटी कधी पुण्यात पाहिली आहे का? हे आम्हाला कमेंट करुन नक्की सांगा.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> पर्यटकांनी चक्क सिंहाचे केस ओढले; जंगलाचा राजा संतापला अन् दाखवला असा इंगा की…VIDEO पाहून थरकाप उडेल
पुणेरी पाट्या म्हणजे पुणेकरांसाठी अभिमानाचा वारसा
‘तुम्हाला प्रत्येक विषयात स्वत:चे मत नसेल तर येथे प्रवेश नाही’, अशा इशार्यापासून ते ‘पगडीखालची खरी बुद्धिमत्ता काय असते हे पाहायचंय?’ असे आव्हान फक्त एकाच शहरात दिले जाऊ शकते, ते म्हणजे पुणे. सुरुवातीला पेठांमध्येच असलेली पुणेरी पाटी शहर पसरले तशी संपूर्ण पुण्यात पसरली. कमीत कमी शब्दांत समोरच्याचा जास्तीत जास्त अपमान करण्याची कला पुणेकरांनाच साधली आहे असे म्हणतात. त्याचप्रमाणे कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त खवचट आशय व्यक्त करणारी पुणेरी पाटीही कोणी येरा गबाळा बनवू शकत नाही. पुणेरी पाट्या म्हणजे पुणेकरांसाठी अभिमानाचा वारसा. केवळ बुद्धिमत्ता नाही तर खास पुणेरी बुद्धीतून पाट्यांच्या माध्यमातून पुणेकरांचा स्पष्टवक्तेपणा आणि थेट भिडण्याची वृत्ती झळकते.