Puneri pati: पुणेकर त्यांच्या वैशिष्टपूर्ण तिरकस स्वभावासाठी नेहमी ओळखले जातात. त्यात पुणेकरांच्या पुणेरी पाट्या ह्या नेहमी चर्चेच्या विषय ठरतात. पुणे म्हटलं की अर्थात पुणेरी पाट्या लक्षात येतातच. पुणेरी पाट्या या अनेकदा चर्चेचा विषय बनतात. कधी वाद तयार करतात तर कधी वादावर भाष्य करतात. कधी चांगला संदेश देतात तर कधी चांगलाच संदेश पोहोचवतात. अशीच एक पुणेरी पाटी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बिना व्यक्त होता आपली मतं ठामपणे आणि थेट मांडण्याचं पुणेकरांचं माध्यम म्हणजे पुणेरी पाटी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणेकर त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण तिरकस स्वभावासाठी नेहमी ओळखले जातात. त्यात पुणेकरांच्या पुणेरी पाट्या ह्या नेहमी चर्चेच्या विषय ठरतात. पुणेरी किस्से आणि पुणेरी पाट्या जगजाहीर आहेत. अशाच एका पुणेरी पाटीची चर्चा सध्या सगळीकडे जोरात सुरू आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारी एक पाटी वाचून तुम्हीही म्हणाल हाच खरा पुणेकर.

पुणेरी पाटी

आपल्याला माहितीये की, पुणेकर भाषेच्या बाबतीत अतिशय कडक आहेत. आपण बोलताना शुद्ध मराठीत म्हणजेच प्रमाणभाषेतच बोलायला हवं, असा त्यांचा आग्रह असतो. पुणेकर स्वत: शुद्ध मराठीत बोलतात. समोरचा हिंदीमध्ये बोलला तरी ते उत्तर मात्र मराठीतच देतात. ‘मराठीतून बोलले पाहिजे, मातृभाषा असल्याने ती बोलताही येते. मात्र, आपण रोजच्या व्यवहारात अन्य भाषांतील शब्दांचा मोठ्या प्रमाणात वापर करतो. त्यामुळे अस्खलित मराठी बोलण्यासाठी थोडा विचार करावा लागतो. ज्याप्रमाणे आपल्या दैनंदिन जीवनात आपण मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करायला हवा. तसंच सोशल मीडियावरदेखील आपण प्राधान्यानं मराठीतच पोस्ट करायला हवी. या पाटीवरही असंच काहीसं लिहिलं आहे, जे खरंच विचार करायला भाग पाडेल.

“मराठी माणसाने मराठी माणसासोबत…”

आता तुम्ही म्हणाल, असं काय लिहिलं आहे या पाटीवर? तर या पाटीवर “मराठी माणसाने मराठी माणसासोबत मराठीतच बोलावे”, असा आशय लिहिला आहे. पुण्यातील तुळशीबागेत ही पाटी लावली आहे. येणारा-जाणारा प्रत्येक जण ही पाटी वाचून याचं समर्थन करीत आहे.

पाहा पुणेरी पाटी

हेही वाचा >> Video: चोरी करण्याची ‘ही’ पद्धत पाहा आणि सावध व्हा; क्षणात मोबाईल लंपास, तुमच्यासोबतही हे घडू शकते

पुणेरी पाट्या म्हणजे पुणेकरांसाठी अभिमानाचा वारसा

‘तुम्हाला प्रत्येक विषयात स्वत:चे मत नसेल तर येथे प्रवेश नाही’, अशा इशार्‍यापासून ते ‘पगडीखालची खरी बुद्धिमत्ता काय असते हे पाहायचंय?’ असे आव्हान फक्त एकाच शहरात दिले जाऊ शकते, ते म्हणजे पुणे. सुरुवातीला पेठांमध्येच असलेली पुणेरी पाटी शहर पसरले तशी संपूर्ण पुण्यात पसरली. कमीत कमी शब्दांत समोरच्याचा जास्तीत जास्त अपमान करण्याची कला पुणेकरांनाच साधली आहे असे म्हणतात. त्याचप्रमाणे कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त खवचट आशय व्यक्त करणारी पुणेरी पाटीही कोणी येरा गबाळा बनवू शकत नाही. पुणेरी पाट्या म्हणजे पुणेकरांसाठी अभिमानाचा वारसा. केवळ बुद्धिमत्ता नाही तर खास पुणेरी बुद्धीतून पाट्यांच्या माध्यमातून पुणेकरांचा स्पष्टवक्तेपणा आणि थेट भिडण्याची वृत्ती झळकते.