Puneri pati viral: पुणेकर त्यांच्या वैशिष्टपूर्ण तिरकस स्वभावासाठी नेहमी ओळखले जातात. त्यात पुणेकरांच्या पुणेरी पाट्या ह्या नेहमी चर्चेच्या विषय ठरतात. पुणे म्हटलं की अर्थात पुणेरी पाट्या लक्षात येतातच. पुणेरी पाट्या या अनेकदा चर्चेचा विषय बनतात. कधी वाद तयार करतात तर कधी वादावर भाष्य करतात. कधी चांगला संदेश देतात तर कधी चांगलाच संदेश पोहोचवतात. अशीच एक पुणेरी पाटी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बिना व्यक्त होता आपली मतं ठामपणे आणि थेट मांडण्याचं पुणेकरांचं माध्यम म्हणजे पुणेरी पाटी. दरम्यान आता आणखी एक पुणेरी पाटी सध्या जोरदार व्हायरल होत आहे. ही पाटी पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल.

सोशल मीडिया हे माहितीचं भांडार आहे. इथे अशा काही गोष्टी पाहायला किंवा ऐकायला मिळतात की, कधी कधी त्यामुळे धक्काच बसतो. तर कधी कधी इथे मीम मटेरीयलदेखील व्हायरल होतं, ज्याला कधी लोक डोक्यावर घेतात; तर कधी ट्रोल करतात. ही पुणेरी पाटीही अशीच व्हायरल होत आहे.

middle-class father video
‘बाप असेल त्या परिस्थितीत आनंदी राहायला शिकवतो…’ मध्यमवर्गीय बापाचा सुंदर VIDEO एकदा पाहाच…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Boy set fire to Akash Kandil
VIDEO: “ही कार्टी काय करतील त्याचा नेम नाही” खेळता खेळता चक्क कंदिल पेटवला; पुढे जे घडलं ते पाहून पोट धरुन हसाल
Marathi ukhana newly married wife took ukhana in front of laws funny ukhana went viral on social media
“मी चिरेन भाजी आणि हे लावतील कुकर”, नव्या नवरीचा उखाणा ऐकून पोट धरून हसाल, पाहा VIDEO
Shocking video of a Girl abuses and assualt auto driver over fare in up mirzapur video viral on social media
तुम्हीच सांगा चूक कोणाची? तरुणीने शिवीगाळ करत रिक्षाचालकाला केली मारहाण, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय घडलं
Makar Sankranti 2025 Funny video of a kid flying a kite with pants falls down viral video
याला म्हणतात नाद! पँट खाली आली पण पतंग नाही सोडली; VIDEO पाहून पोट धरुन हसाल
A bull carrying sugarcane sat on the road
त्यांचा जीव महत्त्वाचा नाही का? ऊस वाहून नेणारा बैल रस्त्यातच बसला अन्… ; काळजाचे पाणी करणारा VIDEO
car is going viral on social media because of the quotes written on its front funny Photo goes viral
PHOTO: दोस्तांचा नादच नाय! मित्र पोलीस म्हणून कारवर लिहलं असं काही की पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल

“केवळ सुसंस्कृत लोकांना सूचना”

आता तुम्ही म्हणाल असं काय लिहलंय या पाटीवर? तर ही पाटी मेट्रोचं काम ज्याठिकाणी सुरु आहे तिथे लावली आहे. बऱ्याच वेळा जिथे काही कामं सुरु असतात तिथे लोक थांबून पाहत असतात. यावेळी तिथे सुरु असलेल्या अर्धवट कामांमुळे तिथे धोका असतो, त्यामुळे तिथून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. मात्र तरीही लोक ऐकत नाही, अशा लोकांना या पुणेरी शैलीत सूचना केली आहे. या पाटीवर “केवळ सुसंस्कृत लोकांना सूचना असं लिहत पुढे, इथुन डोकावून बघू नये, पुणेरी मेट्रोचं काम सुरु आहे.” असं लिहलं आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “ढगाला लागली कळ पाणी…” गाण्यावर मामांचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून पोट धरुन हसाल एवढं नक्की

पुण्यात सुरुवातीला पेठांमध्येच असलेली पुणेरी पाटी शहर पसरत गेले तशा या पाट्या संपूर्ण पुण्यात पसरल्या. कमीत कमी शब्दांत समोरच्याचा जास्तीत जास्त अपमान करण्याची कला पुणेकरांनाच साधली आहे, असे म्हणतात. त्याचप्रमाणे कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त खवचट आशय व्यक्त करणारी पुणेरी पाटीही कोणी येरागबाळा बनवू शकत नाही. पुणेरी पाट्या म्हणजे पुणेकरांसाठी अभिमानाचा वारसा. केवळ बुद्धिमत्ता नाही, तर खास पुणेरी तैलबुद्धीतून पाट्यांच्या माध्यमातून पुणेकरांचा स्पष्टवक्तेपणा आणि थेट भिडण्याची वृत्ती दिसून येते.

Story img Loader