Puneri pati: पुणेकर त्यांच्या वैशिष्टपूर्ण तिरकस स्वभावासाठी नेहमी ओळखले जातात. त्यात पुणेकरांच्या पुणेरी पाट्या ह्या नेहमी चर्चेच्या विषय ठरतात. पुणे म्हटलं की अर्थात पुणेरी पाट्या लक्षात येतातच. पुणेरी पाट्या या अनेकदा चर्चेचा विषय बनतात. कधी वाद तयार करतात तर कधी वादावर भाष्य करतात. कधी चांगला संदेश देतात तर कधी चांगलाच संदेश पोहोचवतात. अशीच एक पुणेरी पाटी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बिना व्यक्त होता आपली मतं ठामपणे आणि थेट मांडण्याचं पुणेकरांचं माध्यम म्हणजे पुणेरी पाटी. दरम्यान अशाच एका पुणेकर तरुणानं भर चौकात अशी पाटी झळकवली की बघून सगळेच पुरुष थांबू लागले. ही पाटी पाहून तुम्हीही म्हणाल पुणे तिथे काय उणे..
जिथे प्रेम आहे, तिथे रुसवे – फुगवे, मानवणे या गोष्टी येतातच नात्यात पार्टनर आपल्यावर रुसतो, फुगतो, रागावतो. पण अशावेळी त्यांना मनवणे आपल्याला कठीण जाते . जोडीदाराची नाराजी राग दूर करणं गरजेचं आहे. पण पार्टनरचं रुसवा घालवणं काही सोपं काम नाही. यावरच या तरुणानं बायकोचा राग आला तर…काय करायचं हे पाटीवर लिहलं आहे आणि ही पाटी रस्त्यावर घेऊन उभा आहे. या पुणेरी पाटीची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु असून तुम्हीही ही पाटी पाहून पोट धरुन हसाल.
असं म्हणतात ज्या नवरा बायकोमध्ये घनिष्ठ नातं असेल त्यांचा संसार खूप सुखी असतो. हे घनिष्ठ नातं तयार होतं एकमेकांशी मन मोकळं केल्याने, एकमेकांना आपल्या मनातील गोष्टी सांगितल्याने, काहीच न लपवल्याने! पण काही पुरुष असे असतात जे आपल्या बायकोला घाबरत असतात म्हणून ते काही गोष्टी तिला सांगत नाहीत, तिच्यापासून लपवून ठेवतात आणि वर बायकोला घाबरतातही. तर काही महिला या मुद्दामच नवऱ्याला त्रास देतात त्यामुळेही कधी कधी नवऱ्याला राग येतो, मात्र हे सगळं क्षणीक असतं, काही वेळाने पुन्हा ते एकत्र येतात. या पुणेकर तरुणानंही ज्यांना आपल्या बायकोचा राग येतो त्यांनी काय करावं हे मनोरंजक पद्धतीने सांगितले आहे, त्यामुळे रस्त्यावरुन येणारे जाणारे पुरुषही ही पाटी पाहून थांबत आहेत.
असं काय लिहलंय पाटीवर
आता तुम्ही म्हणाल या पाटीवर असं काय लिहलं आहे? तर या पाटीवर, “बायकोचा राग आला तर तो गिळा…नाहीतर “गिळायला” मिळणार नाही.” असं लिहलं आहे. थोडक्यात काय तर, बायकोचा राग आला तरी तुमच्याकडे काही पर्याय नाही कारण शेवटी तीच तुम्हाला जेवू घालणार आहे. या तरुणानं हे मनोरंजक पद्धतीनं लिहलं आहे.
पाहा पाटी
हेही वाचा >> ‘तो काळ बनून आला” आसाममध्ये तरुणाचा मृत्यू कॅमेरात कैद; VIDEO मध्ये पाहा नेमकं काय घडलं ?
सोशल मीडियावर हा व्हिडीओ pavanwaghulkar नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.मीत कमी शब्दांत जास्तीत जास्त खवचट आशय व्यक्त करणारी पुणेरी पाटीही कोणी येरा गबाळा बनवू शकत नाही. पुणेरी पाट्या म्हणजे पुणेकरांसाठी अभिमानाचा वारसा. केवळ बुद्धिमत्ता नाही तर खास पुणेरी बुद्धीतून पाट्यांच्या माध्यमातून पुणेकरांचा स्पष्टवक्तेपणा आणि थेट भिडण्याची वृत्ती झळकते.