Puneri pati: पुणे म्हटलं की अर्थात पुणेरी पाट्या लक्षात येतातच. पुणेरी पाट्या या अनेकदा चर्चेचा विषय बनतात. कधी वाद तयार करतात तर कधी वादावर भाष्य करतात. कधी चांगला संदेश देतात तर कधी चांगलाच संदेश पोहोचवतात. अशीच एक पुणेरी पाटी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बिना व्यक्त होता आपली मतं ठामपणे आणि थेट मांडण्याचं पुणेकरांचं माध्यम म्हणजे पुणेरी पाटी. पुणेकर त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण तिरकस स्वभावासाठी नेहमी ओळखले जातात. त्यात पुणेकरांच्या पुणेरी पाट्या ह्या नेहमी चर्चेच्या विषय ठरतात. पुणेरी किस्से आणि पुणेरी पाट्या जगजाहीर आहेत. अशाच एका पुणेरी पाटीची चर्चा सध्या सगळीकडे जोरात सुरू आहे. एक पाटी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही पाटी वाचून तुम्हीही पोटधरून हसाल.

“जीवन खूप सुंदर आहे फक्त सासरा…”

He Borrow Will Stop puneri pati photo viral
PHOTO: “उधार फक्त ‘या’ लोकांनाच दिले जाईल” दुकानाबाहेरील ही पुणेरी पाटी पाहून पोट धरुन हसाल
Pune hotel menu card viral on social media punekar swag puneri pati viral
पुणे तिथे काय उणे! हॉटेलच्या मेन्यू कार्डवर महिलांसाठी सूचना; वाचून म्हणाल “पुणेकरांना एवढा कॉन्फिडन्स येतो तरी कठून?”
Man wrote message for his wife in back of the car
नवऱ्यानं बायकोसाठी कारच्या मागे लिहला खास मेसेज; रस्त्यावर सर्व बघतच राहिले, VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
School Student Funny Marathi Love Letter Viral
PHOTO: “प्रिय आकाश तु मला प्रपोज केलं” शाळेतल्या मुलांचं ‘लव्ह लेटर’ व्हायरल; वाचून पोट धरुन हसाल
Bees attacked on women who had gone for vatpaurnima in Nive village of Poladpur taluka
रायगडात वटपूजन करताना अघटित घडले… जाणून घ्या काय आहे प्रकार…
Person stuck in traffic got bored and ended up doing this video
एकीकडे ट्रॅफिक जाम दुसरीकडे वडिलांचे १५ मिस कॉल्स; तरुणानं केलं असं काही की VIDEO पाहून पोट धरुन हसाल
Police found dead body of a man in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? ८ तास तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला
The puppy will cry after the owner's scream
“आई मला ओरडू नको…” मालकिणीचा ओरडा खाऊन श्वानाच्या पिल्लाला आलं रडू , VIDEO पाहून पोटधरून हसाल

हल्ली मुलांना मुली मिळणं कठीण झालंय. स्वभाव, कुटुंब व अनुरूपता न पाहता शेती-नोकरी, पगार, गाडी, स्वतःचं घर आणि कुटुंबातील कमी सदस्य संख्या यावरच हल्ली लग्न ठरत असतात. मात्र, यावेळी तरुणीनं नाही तर तरुणानंच लग्नासाठी भन्नाट अपेक्षा ठेवल्या आहेत. एका पाटीवर या अपेक्षा लिहिल्या असून, त्या वाचून तुम्हीही पोटधरून हसाल. लग्नासाठी मुलाकडून प्रचंड अपेक्षा करणाऱ्या मुलींना या पुण्याच्या तरुणानंच अपेक्षा सांगितल्या आहेत. एका हॉटेलमध्ये ही पाटी लावली असून, येणारे जाणारे सगळे लोक ही पुणेरी पाटी पाहून थांबत आहेत. आता तुम्ही म्हणाल असं काय लिहिलंय या पाटीवर? तर या पाटीवर “जीवन खूप सुंदर आहे, फक्त सासरा श्रीमंत पाहिजे आणि मुलगी एकुलती एक पाहिजे”, असं लिहिलं आहे.

पाटी पाहून पोट दुखेपर्यंत हसाल

गेल्या काही दिवसांपासून सर्वच समाजांत मुलींचे प्रमाण घटत आहे. अशातच मुलींचे शिक्षण वाढत असल्याने अनेक मुलींना आपल्याला अनुरूप मुलगाच हवा असतो. या वाढत्या अपेक्षेमुळे मात्र अल्पशिक्षित मुलांवर अविवाहित राहण्याची वेळ येते. मात्र, कधी कधी मुलींच्या अपेक्षा नको तेवढ्या असतात. अशाच एका हॉटेल मालकानं हा राग पाटीवर व्यक्त करत त्याच्याही अपेक्षा सांगितल्या आहेत.

पाहा पुणेरी पाटी

हेही वाचा >> एकीकडे ट्रॅफिक जाम दुसरीकडे वडिलांचे १५ मिस कॉल्स; तरुणानं केलं असं काही की VIDEO पाहून पोट धरुन हसाल

‘तुम्हाला प्रत्येक विषयात स्वत:चे मत नसेल तर येथे प्रवेश नाही’, अशा इशार्‍यापासून ते ‘पगडीखालची खरी बुद्धिमत्ता काय असते हे पाहायचंय?’ असे आव्हान फक्त एकाच शहरात दिले जाऊ शकते, ते म्हणजे पुणे. सुरुवातीला पेठांमध्येच असलेली पुणेरी पाटी शहर पसरले तशी संपूर्ण पुण्यात पसरली. कमीत कमी शब्दांत समोरच्याचा जास्तीत जास्त अपमान करण्याची कला पुणेकरांनाच साधली आहे असे म्हणतात. त्याचप्रमाणे कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त खवचट आशय व्यक्त करणारी पुणेरी पाटीही कोणी येरा गबाळा बनवू शकत नाही. पुणेरी पाट्या म्हणजे पुणेकरांसाठी अभिमानाचा वारसा. केवळ बुद्धिमत्ता नाही तर खास पुणेरी तैलबुद्धीतून पाट्यांच्या माध्यमातून पुणेकरांचा स्पष्टवक्तेपणा आणि थेट भिडण्याची वृत्ती झळकते.