Puneri Vacancy Poster Viral: प्रत्येकाला नोकरीची गरज असते आणि त्या त्या कंपनीला नोकरदारांची. नोकरीच्या भरतीसाठी अनेक ठिकाणी जाहिरात दिली जाते. मग त्या जाहिरातीची पोस्टर्स ठिकठिकाणी लावली जातात. हे पोस्टर अनेकदा बंद दुकानाबाहेर, भिंत, विजेचा खांब यांवर पाहायला मिळते. कामासाठी मुली पाहिजेत अशा आशयाचे हे पोस्टर असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणेकर नेहमी त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण तिरकस स्वभावासाठी ओळखले जातात. त्यात पुणेकरांच्या पुणेरी पाट्या हा नेहमी चर्चेचा विषय ठरतो. पुणेरी किस्से आणि पुणेरी पाट्या जगजाहीर आहेत. कारण- पुणेकरांच्या या पुणेरी पाट्या जितक्या वाचायला मजेशीर, तितक्याच त्या खोचकपणे चांगला संदेशही देणाऱ्या असतात. पुणेकरांची शान असलेली ही पाटी अनेकदा लोकांचा अपमान करते; पण ती नियम म्हणजे नियम आणि त्याचे पालन केलेच पाहिजे, असा धडा शिकवून जाते. सोशल मीडियावर अनेकदा या पाट्यांचे फोटो व्हायरल होत असतात. पण, सध्या एक पुणेरी पोस्टर व्हायरल होतेय. त्याद्वारे त्यांच्या मार्केटिंग लेव्हलला तोड नाही, असं दिसतंय.

पुणेकरांच्या मार्केटिंग लेव्हलला तोड नाही

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओध्ये पुणेकरांच्या मार्केटिंग लेव्हलची चर्चा केली जातेय. या व्हिडीओमध्ये दिसणारे भरतीसाठीचं पोस्टर अशा ठिकाणी लावलं आहे, की जे पाहून तुम्हीही चकित व्हाल. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एका ठिकाणी देवांच्या मूर्ती आणि फोटो जेथे ठेवले आहेत अशाच ठिकाणी या पुणेकर महाशयांनी हे भरतीचं पोस्टर लावलं आहे. एकंदरीत त्या ठिकाणी जे कोणी दर्शन घ्यायला जातील, त्यांना हे पोस्टर लगेच दिसेल. या पोस्टरमध्ये “साफसफाई (हाउसकीपिंग)साठी माणूस व बाई पाहिजे,” असं लिहिलं आहे. तसंच त्यात त्यांचा संपर्क क्रमांकदेखील दिलेला आहे.

पुणेकरांच्या मार्केटिंग लेव्हलचा हा व्हिडीओ @punekar2.0_og या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘सगळीकडे पोस्टर आहेत. इंटरेस्टेड लोकांनी लावा फोन’ अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरनं कमेंट करीत लिहिलं, “हे फक्त पुण्यातच घडू शकतं.” दुसऱ्यानं, “पुणेकरांचा नाद नाय!,” अशी कमेंट केली. एक जण कमेंट करीत म्हणाला, “पुणेकर काय करतील आणि कुठे आपली क्रिएटिव्हिटी दाखवतील याचा नेम नाही.”