Pune video viral: पुणेकर त्यांच्या वैशिष्टपूर्ण तिरकस स्वभावासाठी नेहमी ओळखले जातात. पुणेकर कधी वाद तयार करतात तर कधी वादावर भाष्य करतात. कधी चांगला संदेश देतात तर कधी चांगलाच संदेश पोहोचवतात. पुणेरी पाटी तर नेहमीच चर्चेचा विषय असतो. मात्र आता पुण्यात लावलेल्या एका पोस्टरची जोरदार चर्चा सुरु आहे. बिना व्यक्त होता आपली मतं ठामपणे आणि थेट मांडण्याचं पुणेकरांचं माध्यम म्हणजे पुणेरी पाटी. दरम्यान आता आणखी एक पुणेरी पोस्टर सध्या जोरदार व्हायरल होत आहे. रस्त्यावर लावलेलं हे पोस्टर पाहून सगळेच अवाक् झाले आहेत, हा नेमका काय प्रकार आहे हे कोणालाच कळत नाहीये. याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर मात्र तुफान व्हायरल होतोय. पुणेकरांनो तुम्ही पाहिलंय का हे पोस्टर..

सोशल मीडिया हे माहितीचं भांडार आहे. इथे अशा काही गोष्टी पाहायला किंवा ऐकायला मिळतात की, कधी कधी त्यामुळे धक्काच बसतो. तर कधी कधी इथे मीम मटेरीयलदेखील व्हायरल होतं, ज्याला कधी लोक डोक्यावर घेतात; तर कधी ट्रोल करतात. हे पुणेरी पोस्टरही असंच व्हायरल होत आहे.

पुण्यात रस्त्याच्या कडेला लावलेलं हे पोस्टर पाहून तुम्हीही म्हणाल पुण्यात नक्की चाललंय तरी काय? आता तुम्हाला पुढचा प्रश्न पडला असेल की, या पोस्टरवर असं लिहलंय तरी काय? तर या पोस्टरवर मोठ्या अक्षरात चक्क “गाव विकणे आहे” असं लिहलं आहे. तर सुरुवातीला पोस्टरवर “पुणे महापालिकेचा जुलमी टॅक्स भरू शकत नसल्यानं गाव विकणे आहे. समाविष्ट ३२ गाव कृती समिती” असा आशय लिहला आहे. या पोस्टरवरुन असं लक्षात येत आहे की, पुणे माहापालिकेच्या टॅक्सला वैतागून ग्रामस्थांनी हा बॅनर रस्त्यावर लावला आहे. या पोस्टरद्वारे गावकऱ्यांनी पालिकेवर एका प्रकारची टीकाच केल्याचं दिसत आहे. यावेळी रस्त्यावरुन येणारे-जाणारे सगळेच पोस्टर बघून थांबत आहेत. नेटकरीही यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: “शेवटी विषय काळजाचा होता” कुत्र्यांच्या तोंडी स्वत:चा जीव दिला, पण बाळाला आईनं कसं वाचवलं पाहा

पुण्यात सुरुवातीला पेठांमध्येच असलेली पुणेरी पाटी शहर पसरत गेले तशा या पाट्या संपूर्ण पुण्यात पसरल्या. कमीत कमी शब्दांत समोरच्याचा जास्तीत जास्त अपमान करण्याची कला पुणेकरांनाच साधली आहे, असे म्हणतात. त्याचप्रमाणे कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त खवचट आशय व्यक्त करणारी पुणेरी पाटीही कोणी येरागबाळा बनवू शकत नाही. पुणेरी पाट्या म्हणजे पुणेकरांसाठी अभिमानाचा वारसा. केवळ बुद्धिमत्ता नाही, तर खास पुणेरी तैलबुद्धीतून पाट्यांच्या माध्यमातून पुणेकरांचा स्पष्टवक्तेपणा आणि थेट भिडण्याची वृत्ती दिसून येते.