पुणे हे रंजक शहर आहे आणि पुण्यात राहणारे लोक म्हणजे एकापेक्षा एक पात्र आहेत. पुणेकर कधी काय करती हे कोणीही सांगू शकत नाही. कधी पुणेरी रिक्षावाले चर्चेत येत असतात तर कधी पुणेरी पाट्या चर्चेत असतात. कधी खोचक टोमणे मारत तर कधी मज्जा मस्करी पुणेकर नेहमी चर्चेचा विषय ठरतात. कधी गणपती विसर्जन मिरवणूकीदरम्यान एकाद्या पुणेरी आजी किंवा पुणेरी आजोबा वयाची बंधन तोडून बिनधास्तपणे नाचताना दिसतात तर कधी हातात पोस्ट घेऊन पुणेरी तरुण रस्त्यावर फिरताना दिसतात. पुणेकरांचा अंतरगी स्वभाव नेहमी सर्वांचे लक्ष वेधून घेत असतो. सध्या अशाच एका पुणेरी काकांच व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक पुणेरी काकांचा हटके लूक पाहून नेटकरी चक्रावले आहे.

सोशल मीडियावर पुण्यातील अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या अशाच एका व्हिडीओची चर्चा सुरु आहे. व्हिडीओमध्ये एक व्यक्ती पुण्यातील एका रस्त्यावर असलेल्या दुकानासमोर उभा आहे. फुटपाथवर उभ्या असलेल्या या व्यक्तीने पांढरी पँट आणि लांब बाह्या आणि गळ्याभोवती गोलाकार कॉलर असलेला टीशर्ट परिधान केला आहे. गळ्यात गुलाबी रंगाचा स्कार्फ बांधला आहे. व्यक्तीचे चेहऱ्यापर्यंत वाढलेले आहेत आणि त्याने डोळ्यांवक काळा गॉगल चढवला आहे. हा व्यक्ती कपड्यांच्या दुकानाबाहेर ठेवलेल्या पुतळ्यांच्या बाजूलाच उभा आहे त्यामुळे पाहताक्षण तो व्यक्तीही त्या पुतळ्यांपैकी एक पुतळा आहे असे वाटते पण कॅमेरा जसा झुम होतो तसे तो व्यक्ती येणाऱ्या जाणाऱ्यांना टाटा करताना दिसत आहे. नक्की हा व्यक्ती इथे का उभा आहे असा प्रश्न अनेक पुणेकरांना पडला आहे.

हेही वाचा –“सेल्फीच्या नादात…” रेल्वे रुळावर मित्राबरोबर व्हिडिओ शुट करत होता, तेवढ्यात भरधाव वेगाने आली ट्रेन अन्…. थरारक घटनेचा Video Viral

व्हिडीओवर इंस्टाग्रामवर puneyatri आणि pcmc_cashdrop नावाच्या पेजवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,”पुणे तिथे काय उणे” व्हिडीओर काहींनी हसण्याच्या इमोजी टाकल्या आहेत तर काहींनी कमेंट केल्या आहे.. एकाने कमेंटमध्ये लिहिले की, हो मी देखील या व्यक्तीला पाहिले आहे पण, मला नाही माहीत तो कोण आहे?”

हेही वाचा –स्पीडब्रेकरला धडकून हवेत उडत आहेत गाड्या! वाहनचालकांचा जीव धोक्या, पाहा Viral Video

दुसऱ्याने कमेंट केली की, “हे व्यक्ती नेहमी मंडई, तुळशीबाग येथे दिसते. आणखी एक व्यक्ती आहे अशाच वेशात दिसतो”

तिसऱ्याने लिहिले, “पुणे तिथे काय उणे आणि बाहेरून आलेत सगळे नमुने”

jitendra Joshi as SAINATH in duniyadari movie
फेसबुक (DUNIYADARI)

व्हिडिओ पाहून अनेकांना दुनियादारी चित्रपटातील जिंतेद्र जोशींनी साकारलेली भूमिका साईनाथची आठवत आहे ज्यामध्ये तो अशाच प्रकारचे टीशर्ट परिधान करतो. त्याने साकारलेल्या भुमिकेचा “मेव्हणे मेव्हणे, मेव्हण्यांचे पाहुणे” डायलॉग प्रचंड गाजला होता.