Viral video: सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे आपण पुन्हा पुन्हा पाहतो. सोशल मीडियावर सध्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच रील्स बनवत असतात. अशातच पुणेकरांचा विषय म्हंटलं की सगळ्यांच्या भुवया वर होतात. आतापर्यंत हळदीमध्ये अनेकजण नाचले मात्र सध्या पुणेकरांनी हळदीला केलेला तुफान डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, पुणेकरांचा नाद नाय बुवा.
आयुष्यात मित्र खूप महत्त्वाचे असतात, असं म्हटलं जातं. एकीकडे ते आपल्या प्रत्येक सुख-दुःखात आपल्या सोबत असतात तर दुसरीकडे मस्ती करण्यातही तितकेच पुढे असतात. काही अगदी बॉडीगार्डप्रमाणे सतत आपल्या आजूबाजूला असतात तर काही लोकांमध्येही आपली मस्करी करण्याची संधी सोडत नाहीत. लग्नात तर मित्र अगदी विचित्र मस्करी करताना दिसतात. अनेकदा मित्रांचे कारनामे सोशल मीडियावर व्हायरल होतात, असाच एक हळदीतील मित्र-मंडळी आणि शेजाऱ्यांचा डान्स सध्या तुफान व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तु्म्हीही पोट धरुन हसाल एवढं नक्की.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका मुलीची हळद आहे. तिच्या हळदीला मित्र मंडळी, नातेवाईकांसह शेजाऱ्यांनीही उपस्थिती लावली आहे. यावेळी या सगळ्यांनी मिळून नवरीची हळद चांगलीच गाजवली आहे. यामध्ये सगळे पुणेकर एकत्र भन्नाट डान्स करत आहे. यावेळी पाठीमागे वाजणारं गाण ऐकून तर तुम्हालाही हसू येईल. ए माझ्यापेक्षा भारी नाचून दाखवायचं..कोण कोण नाचणार ? म्हणत पुणेकरांनी जी सुरुवात केली, त्यानंतर त्यांनी थांबायचं नावच घेतलं नाही. ए मेरे लाडी को सासरवाडी को लेके जाउ क्या..मेरे लाडी को सासरवाडी को लेके जाउ क्या..मै तुझसे मिलने आ जाऊ क्या, अन बोल मै हलगी बजावू क्या..या गाण्यावर पुणेकरांनी अक्षरश: राडा केला आहे.
पाहा व्हिडीओ
पुणेकरांचा डान्स व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सध्या व्हायरल होत असून तो व्हिडिओ omkar_barawkar या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर कॅप्शनमध्ये,”जेव्हा पुण्यात कोकणी पद्धतीची लग्नपूर्वक हळद असते” असे लिहिण्यात आलेले आहे. एवढेच नाही तर व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर काही दिवसातच व्हिडिओला ६ हजारांपेक्षा अधिचे लाईक्स मिळाले आहे तर हजारोंच्या घरात व्ह्यूज मिळाले आहेत.