श्रीमंत दगडूशेठ गणपती म्हणजे पुणेकरांचा लाडका बाप्पा. गणेशोत्सवादरम्यान लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी यंदा भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती अगदी पहाटे ४-५वाजेपर्यंत भक्तांच्या तुडुंब गर्दीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. गणेशोत्वादरम्यानच नव्हे तर ऐरवीही बाप्पाच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात. रोज जाता येता लाडक्या बाप्पाची एक झलक पाहण्यासाठी रोज आवर्जून मंदिरासमोर थांबतात. कित्येक लोक लांबून फक्त फक्त बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतात. सध्या असाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी लागलेली मोठी रांग दिसत आहे.

श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी बारा महिने भाविक मोठ्या संख्येने येत असतात. पण काल २० ऑक्टोबर रोजी संकष्टी चतुर्थी असल्याने भाविकांची संख्या रोजच्यापेक्षा दुप्पट झाली होती. बाप्पााच्या दर्शनासाठी भली मोठी रांग लागली होती. व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती रांग कुठे संपते हे शोधत शेवट पर्यंत जातो. दगडूशेठ गणपती मंदिरापासून सुरु झालेली ही मोठी रांग आप्पा बळवंत चौकापर्यंत लागली होती.

हेही वाचा –‘प्रत्येक जीव मौल्यवान असतो!’ बेशुद्ध सापाला CPR देऊन तरुणानं दिलं जीवदान! Viral Videoमध्ये पाहा थरारक बचाव मोहिम

हेही वाचा –स्त्री २च्या “काटी रात मैने..” गाण्यावर चिमुकलीचा भन्नाट डान्स, Viral Video पाहून श्रद्धा कपूरनेही केले कौतुक

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पुणेकरांना हा व्हिडिओ आवडला आहे. अनेकांनी व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत. एकाने कमेंट केली की, पुण्याचे मालक ,मालकांचे पुणे, श्रद्धास्थान-श्रीमंत दगडूशेठ हलवाई.”

भली मोठी रांग पाहून एक जण म्हणाला, “मी लांबूनच दर्शन घेऊन आलो.”

दुसरा म्हणाला की, “आज मी गेलो होते सकाळी ८.३०वाजता. एवढीच रांग होती.”

व्वा रे पठ्या! “अशी मी मदन मंजिरी” गाण्यावर तरुणाचे भन्नाट नृत्य, थेट फुलवंतीला दिली टक्कर, पाहा Viral Video

तिसरा म्हणाला की, लवकर जायचे, रांग केवळ तांबडी जोगेश्वरी मंदिराच्या दारातून सुरु झाली.”

चौथा म्हणाला की, “पुणे तिथे काय उणे!”

पाचवा म्हणाला,”पहाटे पाच वाजता जा, पाच मिनिटांत दर्शन होईल”

Story img Loader