आजवर आपण ‘आम्ही घर शिफ्ट करतोय’ हे वाक्य अनेकदा ऐकलं असेल, साहजिकच याचा अर्थ आम्ही घरातल्या वस्तू, आमचं कुटुंब दुसरीकडे राहायला जात आहोत असाच होतो. मात्र पंजाब मधील एका शेतकऱ्याने घर शिफ्ट करणे जरा जास्तच मनावर घेतल्याचं समजतंय. एएनआयच्या माहितीनुसार, पंजाबमधील रहिवाशी सुखविंदर सिंह सुखी यांनी चक्क आपले दुमजली घर मूळ जागेवरून उचलून ५०० फूट अंतरावर ठेवल्याचे समजत आहे. या घराच्या शिफ्टिंगचा व्हिडीओ पाहून नेटकाऱ्याने या शेतकऱ्याच्या जुगाडू बुद्धीचं कौतुक केलं आहे.
प्राप्त माहितीनुसार, दिल्ली- अमृतसर- कटरा एक्सप्रेसवेलगत सुखविंदर यांचे दुमजली घर होते, मात्र या एक्सप्रेसवेच्या कामासाठी पंजाब सरकारकडून त्यांना घर खाली करण्यास सांगितले गेले. यासाठी योग्य भरपाई दिली जाईल अशी ऑफर सरकारने दिली असताना सुखविंदर यांनी आपण मेहनतीने बांधलेले घर सोडून जाण्यास नकार दिला. संगरूरमधील रोशनवाला गावात हे घर बांधण्यासाठी सुखविंदर यांनी दीड कोटी रुपये खर्च केले होते. आपल्या स्वप्नातील हे घर वाचवण्यासाठी शेवटी सुखविंदर यांनी घर उचलून बाजूला करण्याचा मार्ग निवडला.
Video: बुलेटवरून Swag Entry घ्यायला निघाली नवरी.. पुढे असं झालं की रस्त्यावरचे लोक सुद्धा बघत बसले
ANI ट्विट
ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, घर हलवण्यासाठी एका खासगी कंत्राटदाराला काम देण्यात आले आहे.घर हलविण्यासाठी एकूण ५० लाख रुपये खर्च व दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. सध्या घर २५० फूट अंतरावर हलवण्यात आले आहे.
(हे ही वाचा: रिक्षावाल्याचा नादखुळा! ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतर काय केलं पाहा; Video झाला Viral)
दरम्यान, प्रवासाचा वेळ कमी करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या भारतमाला प्रकल्पांतर्गत एक्सप्रेसवे बांधला जात आहे. हरियाणा, पंजाब आणि जम्मू-काश्मीरमधून हा मार्ग जाणार आहे.