स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी, आपल्याजवळ खुप पैसा आहे, धन आहे. पण मायेनं डोक्यावरून हात फिरवणारी, मायेची सावली देणारी आई नसेल तर कशालाही किंमत नाही. आईची किंमत ही आई गेल्यावरच कळते असं नेहमी आपण एकत आलोय. काहींना आईची किंमत कळते तर काहींना आईच नकोशी झालेली असते. ज्या आईनं आपल्याला जन्म दिला तिच आई नकोशी कशी होत असेल. तिच्याच जिवावर उठायची हिमंत कशी होत असेल. याआधीही अशा अनेक घटना तुम्ही पाहिल्या असतील, दरम्यान अशीच एक संतापजनक घटना सध्या समोर आली आहे. यामध्ये पोटच्या मुलानंच जन्म देणाऱ्या आईचे जनावरासारखे हाल केले आहेत. आईला अमानुष मारहाण केल्याचा व्हिडीओही सध्या व्हायरल होत आहे.

पोटच्या मुलाचं अमानवी कृत्य

ही घटना पंजाबच्या रूपनगर जिल्ह्यातली असल्याचे समोर आलं आहे. रोपडे ज्ञानी जैल सिंह नगरमध्ये ७५ वर्षीय वृद्ध महिला आशा वर्मा तिचा मुलगा अंकुर शर्मा त्याची बायको आणि मुलासोबत राहत होत्या. मात्र पेशानं वकिल असणारा आशा वर्मा यांचा मुलगा अंकुर शर्माने स्वत:च्या आईसोबत अमानुष असे कृत्य केले आहे. पोटच्या मुलानं असं कृत्य केलेलं पाहून सर्वच संताप व्यक्त करत आहे. अंकुर शर्मा आईला आईला बेदम मारहाण करायचा. कधी तिचा गळा दाबायचा, तर कधी डोकं पकडून आपटायचा. तर कधी पाठीत बुके घालायचा. या छळात अंकुरच्या बायकोचा आणि मुलाचाही समावेश असायचा.

केस ओढले, कानशिलात लगावली अन्

दरम्यान या संपूर्ण घटनेची माहिती वृद्ध महिलेची मुलगी दीपशिखाला होती. मात्र तिच्याकडे भाऊ अंकुर विरोधात पुरावे नव्हते, त्यात तो वकीलही होता. त्यामुळे दीपशिखाने वृद्ध आईला भेटण्याच्या बहाणे जाऊन घरात एक छुपा कॅमेरा लावला होता. या कॅमेरात भावाचे अमानवीय कृत्य कैद झाले होते. त्यानंतर त्या छुप्या कमेरात ही घटना कैद झाली. यामध्ये तुम्ही पाहू शकता, वृद्ध महिला बेडवर झोपली असताना मुलगा अंकुर वर्मा येतो आणि आईला मारहाण करायला लागतो. तो अक्षरश:आईचे केस ओढतो, तिच्या गालात सतत चापट मारतोय. डोक आपटतोय. हा व्हिडीओ बघूनच अंगावर काटा येतो.

नातू आणि सूनही सहभागी

दुसऱ्या व्हिडिओत अंकुरचा मुलगा आणि पीडित महिलेचा नातू बेडवर स्वत:च पाणी आततो आणि वडिलांकडे आजीने लघवी केल्याची तक्रार करतो. या तक्रारीनंतर अंकुर आईला बेडवर धक्का देऊन आपटतो आणि अमानुष मारहाण करतो. पंजाबचा पत्रकार गगनदीप सिंहने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

पाहा व्हिडीओ

पोलिसांनी वृद्ध महिलेला केलं रुग्णालयात दाखल

हेही वाचा >> बापरे! नुकत्याच जन्मलेल्या बाळाला अजगरानं गिळलं; पाहा गावकऱ्यांनी कसं बाहेर काढलं, VIDEO पाहून थक्कच व्हाल

ही घटना उघडकीस आल्यानंतर मुलावर गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. तसेच पोलिसांनी वृद्ध महिलेचीही सुटका करुन तिला रुग्णालयात दाखल केलं आहे. एअनाय वृत्तसंस्थेनं याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे.

Story img Loader