पंजाबमधील कपूरथला येथील सुलतानपूर लोधी उपविभागातील शालापूर बेट गावात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. येथे एका शिक्षकाने क्रूरतेचा कळस गाठला आहे. यात शिक्षकाने एका विद्यार्थ्याला कारच्या बोनेटवर बसवून त्याला चक्क १० किमीपर्यंत फरफटत नेले आहे. या घटनेनंतर संबंधित विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ही घटना ऐकून गावकऱ्यांना धक्का बसला आहे.

नेमकी घटना काय आहे?

वृत्तानुसार, विद्यार्थ्याने सांगितले की तो सुलतानपूर लोधी येथील एका खाजगी अकॅडमीमध्ये आयलेट्स शिकत होता. एक दिवस तो रस्त्यावरील एका वळणावर उभा असताना त्याच्यामागून एक कार आली, ज्यामध्ये शिक्षक बलजिंदर सिंग प्रवास करत होता. या कारने त्याला धडक दिली आणि बोनेटवर बसवून संपूर्ण परिसरात गाडी फिरवली. यावेळी विद्यार्थ्याने उडी मारून आपला जीव वाचवल्याचे तो सांगतो. या घटनेनंतर विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर आता शासकीय आरोग्य केंद्र टिब्बा येथे उपचार सुरू आहेत. एका जुन्या वादाचा बदला घेण्यासाठी शिक्षकाने असे कृत्य केल्याचे बोलले जात आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओही वेगाने व्हायरल होत आहे.

Haryana Bus Accident
Haryana : धक्कादायक! टोल वाचवण्यासाठी बस चालकाने टोल कर्मचाऱ्याला चिरडलं, घटनेचा व्हिडीओ व्हायरल
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Mumbai young boys present amazing lavani dance
Video : मुंबईच्या तरुणांनी मरीन ड्राइव्ह येथे सादर केली भन्नाट लावणी, व्हिडीओ पाहून गौतमी पाटीलला विसराल!
notorious gangster gajya marne
कुख्यात गुंड गजा मारणे याच्या चित्रीकरणाचा प्रसार; चार महाविद्यालयीन विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात
Shocking video a girl dies after goods train hit her while crossing tracks in up video goes viral on social media
VIDEO: मृत्यू कसा जाळ्यात ओढतो पाहा; रुळ ओलांडताना नक्की काय घडलं?; तरुणीनं फक्त २ सेकंदांसाठी गमावला जीव
daund taluka , school girl rape contract ,
धक्कादायक! विद्यार्थिनीवर बलात्कार आणि खून करण्यासाठी विद्यार्थ्याने दिली १०० रुपयांची सुपारी
Attempted kidnapping of Birla College student in Kalyan
कल्याणमध्ये बिर्ला महाविद्यालयातील विद्यार्थ्याच्या अपहरणाचा प्रयत्न
Dangerous transportation of students by vehicle continues in Vasai Possibility of accident
वसईत विद्यार्थ्यांची वाहनातून धोकादायक वाहतूक सुरूच; अपघाताची शक्यता

पोलिसांचा तपास सुरू

वेगवान कारच्या बोनेटवर एका विद्यार्थ्याला बसवून कार भरधाव वेगाने जात असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. विद्यार्थ्याने सांगितले की, शिक्षकावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. यामुळे आरोपी शिक्षिकाला अटक करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Story img Loader