Punjab Viral Video: सोशल मीडियावर अनेकदा वेगवेगळ्या घटनांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता पंजाबच्या जालंधरमधील एका भयानक घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एका विद्यार्थिनीला तीन दुचाकीस्वार चोरटे रस्त्यावरून फरफटत नेताना दिसत आहेत. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला आहे. या संदर्भातील वृत्त फ्री प्रेस जर्नलने दिलं आहे.

नेमकी काय घडलं?

पोलिसांच्या माहितीनुसार, पंजाबच्या जालंधरमधील ग्रीन मॉडेल परिसरात ही घटना शुक्रवारी घडल्याचं सागितलं जात आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये असं दिसत आहे की, एक मुलगी रस्त्याने जात होती. मात्र, एवढ्यात दुचाकीवरून तीन चोरटे आले आणि विद्यार्थिनीकडून मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. दुचाकीवरील तीन चोरट्यापैंकी एकजण दुचाकी चालवत होता. तर दुचारीवर मध्ये बसलेल्या चोरट्याने तोंड रुमालाने झाकलेले होते. ही मुलगी रस्त्यावरून जात असताना अचानक एक दुचाकी तिच्यापाशी थांबली आणि दुचाकीवरील एका व्यक्तीने तिला सॉरी म्हणाला. त्यामुळे त्या मुलीला काही समजलं नाही.

हेही वाचा : बापरे! भर दिवसा एकटी महिला पाहून त्यानं संधी साधली; धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही VIDEO मध्ये कैद

यानंतर लगेचच दुचाकीवर मागे बसलेल्या चोरट्याने तिचा मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलीने आपला मोबाईल सोडला नाही. उलट मोबाईल हिसकावणाऱ्याचा हात त्या मुलीने धरला. पण यानंतर दुचाकीस्वरांनी मोबाईल हिसकावला आणि पळ काढला. यावेळी त्या मुलीलाही चोरट्यांनी रस्त्यावरून फरफटत नेलं असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. अखेर फोन हिसकावण्यात चोरट्यांना यश आलं. व्हिडीओमध्ये चोरट्यांनी त्या मुलीला फरफटत नेल्याचं दिसत असून त्यामागे एक व्यक्ती पळताना दिसत आहे.

पंजाबच्या जालंधरमधील एका मुलीला फरफटत नेल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा तातडीने तपास सुरु केला आहे. पंजाब पोलिसांनी तापासाची चक्र फिरवली असून त्याच परिसरात याआधी अशा प्रकारच्या काही घटना घडल्याची माहिती सांगण्यात आली आहे. आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरु केला असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असं सांगण्यात आलं आहे.