हातात जवळपास धार धार सुरा घेऊन चोरी करायला आलेल्या चोराने तुम्हाला जर आताच्या आता जवळपास असलेले सारे पैसे काढून दे असे सांगितले तर तुम्ही काय कराल ? एकतर मुकाट्याने त्याला पैसे द्याल किंवा दुसरा धाडसी पर्याय म्हणजे त्या चोराशी दोन हात करायचे. पण जर असा प्रसंग आलाच तर पैशापेक्षा जीव बरा असे बोलून समोरचा आपला खिसा त्या चोरापुढे रिकामी करेल पण एका पंजाबी महिलने जे केले त्याने तिचा जीवही वाचला आणि चोरही चोरी न करता घाबरुन पळून गेला.
या महिलेने चोराशी दोन हातही केले नाही ना त्याला आपल्या जवळची रक्कम लूटु दिली त्यामुळेच या पंजाबी महिलेची जास्त चर्चा होत आहे. ४९ वर्षीय करमजीत संघा यांचे ब्रिटनमध्ये दुकान आहे. सकाळी त्या दुकानात गेल्या असता धारधार सुरा घेऊन एक चोर दुकानात शिरला त्यांने पैशांची मागणी या महिलेकडे केली पण तरीही न घाबरता त्यांनी चोराला ‘मला माझी चहा संपवू दे मग तू चोरी कर’ असे उत्तर दिले. त्यामुळे रागावलेल्या चोराने त्यांना चहा खाली ठेवण्यास सांगितले, तेव्हा या महिलेने बाजूला ठेवलेला कटर उचलला आणि चोराला घाबरवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वैतागलेल्या चोराने तिथून काढता पाय घेतला त्यानंतर या चोराला अटक करण्यात आली. त्याला पाच वर्षांचा कारावास सुनावण्यात आला. युके मधल्या एक्सप्रेसने ही माहिती दिल्यानंतर या पंजाबी महिलेची पोस्ट व्हायरल झाली आहे.