Anand Mahindra Shares Puppy Video : महिंद्रा समुहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आनंद महिंद्रा सोशल मीडियावर सक्रीय राहून नवनवीन व्हिडीओ शेअर करत असतात. महिंद्रा ट्विटरवर पोस्ट शेअर करून माणसांमध्ये दडलेलं छुपं टॅलेंट जगासमोर आणण्याचा प्रयत्न करतात. पण आता त्यांनी प्राण्यांमध्येही लपलेलं जबरदस्त टॅलेंट एका व्हिडीओच्या माध्यमातून समोर आणलं आहे. एका कुत्र्याच्या पिल्लाचा व्हिडीओ शेअर करुन महिंद्रा यांनी हजारो नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. कुत्र्याच्या हा सुंदर व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी यावर सुंदर प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. हा व्हिडीओ इतका जबरदस्त आहे, की तुम्ही व्हिडीओ पाहिल्यानंतर नक्कीच वाहवा केल्याशिवाय राहणार नाही.
कुत्र्याच्या व्हिडीओ शेअर करुन महिंद्रा यांनी सुंदर कॅप्शन दिलं, म्हणाले….
आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओत भारताच्या शास्त्रीय संगीतावर एक कुत्र्याचं पिल्लू सुंदर ठुमके लगावताना दिसत आहे. ३० सेकंदांचा हा व्हिडीओ इंटरनेटवर लाखो नेटकऱ्यांची मनं जिंकत आहे. या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला शास्त्रीय संगीत ऐकायला येत आहे. संगीत सुरु होताच कुत्र्याचं पिल्लू संगीताचा मनमुराद आनंद लुटत असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. कुत्र्याचे सुंदर हावभाव पाहून नेटकऱ्यांच्या मनालाही भुरळ पडली आहे. एका तरुणीने कुत्र्याच्या पिल्लाला हातात घेतलं असून संगीताच्या तालावर तो जबरदस्त डान्स करताना या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.
इथे पाहा व्हिडीओ
ट्विटरवर शेअर केलेल्या या व्हिडीओला ८६ हजारांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. व्हिडीओ शेअर करत आनंद महिंद्रा यांनी सुंदर कॅप्शनही दिलं आहे. या व्हिडीओला प्रतिक्रिया देताना आनंद महिंद्रा म्हणाले, ” या तरुणीबद्दल आणि संगीत विश्वातील तिच्या मित्राबद्दल मला माहित नाहीये. मला हा व्हिडीओ खूप आवडला. या व्हिडीओनं माझं मनोरंजन केलं, म्हणून मी हा व्हिडीओ शेअर करत आहे. हे कुत्र्याचं पिल्लू एक दिवस ‘अरंगेत्रम’मध्ये स्टेज गाजवणार, असं मला वाटतंय.” महिंद्रा यांनी शेअर केलेला कुत्र्याचा व्हिडीओ इंटरनेटवर अधिराज्य गाजवत असून नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. कुत्र्यामध्ये लपलेल्या छुप्या टॅलेंटचं नेटकरी कौतुक करताना दिसत आहेत.