निसर्गान प्रत्येकाला सुंदर शरीर दिले आहे. पण आपल्याला प्रत्येकाला एका फिल्टर लेन्समधून पाहण्याची सवय झाली आहे. रंग गोरा आहे म्हणजे तो व्यक्ती सुंदर असा अनेकांचा समज असतो. पण सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या नजरेत असते. याचे सुंदर उदाहरण म्हणजे हा फोटो. सध्या एक सुंदर डोळ्यांच्या रिक्षाचालकाचे फोटो सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. एका फोटोग्राफरने त्याचे छायाचित्र क्लिक करून सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्यानंतर हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.
एका फोटोग्राफरला वाटेत एका रिक्षाचालकाला पाहिले आणि त्याला काही फोटो काढू शकतो का अशी विनंती केली. ज्यावर तो रिक्षाचालक हो म्हणाला. त्या फोटोग्राफरने रिक्षावाल्याला आपल्या कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये कॅप्चर केले, यानंतर लोक हे फोटो तो मॉडेलपेक्षा कमी नाही असे म्हणत आहेत. काही युजर्सना रिक्षावाल्याचे हे व्हायरल फोटो पाहून पाकिस्तानी चाय वाल्याची आठवण झाली.
रिक्षा चालकाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल
अंकित (@framesbyankit) या फोटोग्राफरने रिक्षा चालकाचे हे फोटो काढले आहेत. अंकित हा अनोळखी व्यक्तींचे फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट करतो. १ ऑगस्ट रोजी त्याने एक रिल पोस्ट केली होती. जी लोकांना इतकी आवडली ती इन्स्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर व्हायरल होऊ लागली. या रीलमध्ये एक ई-रिक्षा चालक आहे, ज्याला अंकितने काही क्षणांसाठी स्वत:चा मॉडेल बनवला आणि त्याचे कॅमेऱ्यात कैद केले, रिक्षा चालकही फोटो बघून म्हणाला – फोटो एकदम अप्रतिम आले आहेत!
हा फोटोग्राफर जुन्या दिल्लीतील रस्त्यांवर फिरत होता. यावेळी त्याला एक तरुण रिक्षाचालक दिसला. ज्याचे डोळे खूपच सुंदर होते. त्यामुळे फोटोग्राफरला त्याचा फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. यावेळी फोटोग्राफरने त्याला विचारले की, तुझे नाव काय आहे? यावर रिक्षा चालकाने उत्तर दिले की, त्याचे नाव तरुण असून तो यूपीचा आहे. यावर त्यानेही फोटो काढण्यास परवानगी दिली आणि काही वेगळ्या पोझ द्यायला सुरुवात केली. फोटो क्लिक झाल्यानंतर तरुणने त्याच्या आयुष्यातील संघर्षाचा किस्सा सांगितला. तो म्हणाला की, तो पहाटे ५ ते रात्री ८ पर्यंत रिक्षा चालवतो. त्याचे कुटुंब फक्त मुरादाबादमध्ये राहते.