सलग ७ दिवसांपासून रशियन सैन्य युक्रेनमध्ये कहर करत आहे. चौफेर टीका होऊनही रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आपल्या निर्णयावर ठाम आहेत. युक्रेनला शरणागती पत्करावी लागेल, त्याशिवाय युद्ध संपवण्याचा दुसरा मार्ग नाही, असे रशियाने स्पष्ट केले आहे. याउलट युक्रेननेही रशियापुढे झुकणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. या विनाशकारी युद्धाविरुद्ध रशियामध्येही अनेक ठिकाणी निदर्शने होत आहेत. चौफेर विरोधामुळे पुतिन यांचा रोष आता समोर आला आहे. त्यांच्या प्रशासनाने आंदोलनात सहभागी असलेल्या निष्पाप मुलांनाही तुरुंगात ढकलले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिरर वेबसाइटने रशियन विरोधी राजकारण्याचा हवाला देत म्हटले आहे की रशियामधील प्राथमिक शाळेतील मुलांना युद्धविरोधी निषेध केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. इल्या याशिनने सोशल मीडियावर पोलिस व्हॅनच्या मागे फलक घेतलेल्या तीन मुलांचा फोटो शेअर केला आहे.

पुतिन यांचं युक्रेननंतरचं टार्गेट ठरणार ‘हा’ देश; बेलारुसच्या राष्ट्रपतींनी चुकून उघड केलं गुपित

ट्विटरवर ट्रेंड होतंय #IStandWithPutin; अमेरिकेला संधीसाधू म्हणत नेटकरी देत आहेत रशिया-भारत मैत्रीचा दाखला

पोलिसांच्या कारवाईची भीती असतानाही व्लादिमीर पुतिन यांच्या युक्रेनमधील क्रूर युद्धाचा निषेध करण्यासाठी हजारो रशियन रस्त्यावर उतरले आहेत. मानवाधिकार प्रकल्प ओवीडी-इन्फोनुसार, सुमारे ५० शहरांमधील जवळपास ७००० लोकांना आधीच ताब्यात घेण्यात आले आहे. निष्पाप मुलांची छायाचित्रे ट्विट करत याशिन म्हणाला, ‘येथे काहीही ठीक नाही. युद्धविरोधी पोस्टर घेतल्यामुळे या मुलांना अटक करण्यात आली. हा पुतिनचा रशिया आहे मित्रांनो… तुम्ही फक्त इथे राहता.’ एका मुलाने पोस्टर हातात घेतलेले दिसत आहे.

आत्तापर्यंत रशियन सैन्याने युक्रेनच्या अनेक शहरांमध्ये मोठा विध्वंस केला आहे. मंगळवारी, रशियन क्षेपणास्त्रांनी कीवमधील एका टीव्ही टॉवरवर हल्ला केला, ज्यात पाच लोक ठार झाले. या हल्ल्यानंतर युक्रेनच्या टीव्ही चॅनेलचे प्रक्षेपणही बंद करण्यात आले.