रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर होत आहे. मोठमोठ्या कंपन्यांना या युद्धाची झळ बसत आहे. अनेक कंपन्यांनी रशियामध्ये आपले कामकाज पूर्णपणे थांबवले आहे. यानंतर रशियाकडूनही कठोर पावले उचलली जात आहेत. आता रशियामध्ये इंस्टाग्राम वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
रशियाने सोमवारी १४ मार्चला देशातील जवळपास ८ कोटी वापरकर्त्यांसाठी इंस्टाग्राम बंद केले आहे. हा निर्णय इंस्टाग्रामच्या वापरकर्त्यांसाठी अतिशय धक्कादायक आहे. इंस्टाग्रामवरील रशियन इन्फ्लुएन्सर्सनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून त्यांच्या फॉलोवर्ससाठी निरोप संदेश पोस्ट केला आणि त्यांना इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्याला फॉलो करण्याचे आवाहन केले आहे.
सोन्यापेक्षाही महाग आहेत ‘ही’ द्राक्षे; एका घडाची किंमत ऐकून बसेल धक्का
पुतिन यांच्या या निर्णयाचा एका तरुणीला मोठा धक्का बसला असून यातून सावरणे तिला कठीण जात आहे. तिने टेलिग्राम या अॅपवरून रडत रडत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ही तरुणी एक ब्युटी ब्लॉगर आहे. तिने या व्हिडीओमध्ये म्हटलंय, “तुम्हीही असाच विचार करता का की इंस्टाग्राम हे केवळ माझ्या उत्पन्नाचा स्रोत आहे? इंस्टाग्राम माझ्यासाठी माझे आयुष्य आहे. माझी आत्मा आहे. यासोबतच मी झोपते आणि उठते. गेली ५ वर्षे मी इंस्टाग्रामचा वापर करत आहे.”
या मुलीने आपल्या फॉलोवर्सना, इंस्टाग्राम बॅनची बातमी ऐकून ती किती दुःखी आहे हे सांगितले. तथापि, या मुलीला सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या टीकेला सामोरे जावे लागले आहे. नेटकऱ्यांनी म्हटले की तिला तिच्या देशबांधवांसह हजारो मृत लोकांपेक्षा स्वतःची जास्त काळजी आहे. नेक्टा टीव्हीने या मुलीवर टीका करत आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, ‘साहजिकच, सध्या तिची सर्वात मोठी चिंता ही आहे की ती रेस्टॉरंटमधील जेवणाचे फोटो पोस्ट करू शकणार नाही.’ ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ब्लॉगरच्या व्हिडिओवर नेटिझन्सनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
YouTube वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी; कायदेशीर कारणांमुळे लवकरच ‘हे’ अॅप होणार बंद
द व्हर्जच्या वृत्तानुसार, इंस्टाग्रामने श्रीमंत अभिजात वर्ग आणि त्यांच्या कुटुंबांसह रशियन लोकांना युद्धाविरुद्ध बोलण्यासाठी एक व्यासपीठ देखील प्रदान केले आहे. गेल्या आठवड्यात, रशियन सरकारच्या कम्युनिकेशन एजन्सीने घोषित केले की ते १४ मार्चपासून रशियामध्ये इंस्टाग्रामच्या वापरावर बंदी आणेल. इंस्टाग्रामचे प्रमुख अॅडम मोसेरी यांनी सांगितले की, रशियामध्ये इंस्टाग्रामवर ८० टक्क्यांहून अधिक लोक रशियाबाहेरील अकाउंट फॉलो करतात.