प्रेमभंग झाल्यानंतर आपल्या प्रियकर किंवा प्रेयसीला अद्दल घडवण्यासाठी कोण कोणत्या थराला जाईल सांगता येत नाही. तशा अनेक बातम्या आपण वाचत असतो. अगदी प्रेम नाकारणा-या तरुणीवर हल्ले करण्याइतकीही मजल गेल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत. पण कधी कधी काटा काढण्याच्या पद्धतीपण अगदी हास्यस्पद असतात. तो प्रेमभंगातून व्हायरल झालेला ‘सोनम गुप्ता बेवफा है’ हा किस्सा आपल्याला आठवत असेलच. असाच काहीचा प्रकार एका तरुणीने केला आहे. आपला विश्वासघात करणा-या प्रियकराच्या बेवफाईचे या तरुणीने चक्क पोस्टरच गावभर लावले. आता कोणीतरी या पोस्टरचे फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल केले अन् चर्चेसाठी नवा विषय मिळाला.

Viral Video : सफरचंद सोलण्याची भन्नाट पद्धत

आपला प्रियकर कोणा दुसरीसोबत मज्जा करतोय हे जेव्हा प्रेयसीला समजले तेव्हा तिने आपल्या पद्धतीने दगाबाज प्रियकराचा काटा काढण्याचे ठरवले. तिने एक खोचक संदेश असणारा पोस्टर बनवला अन् त्या पोस्टरच्या अनेक प्रिंट तिने शेजारी पाजारी जिथे जागा मिळेल तिथे चिटकवल्या. आपल्या प्रियकराचे नाव हृदयात कोरून ते हृदय फासावर लटकलेले चित्र तिने पोस्टवर लावले. वरून गाडीच्या चाव्या गटारात फेकून दिल्या आणि कार्ड लिमिट पेक्षा जास्त वापरले असाही संदेश त्यात लिहिला. जाता जाता त्याला नवीन वर्षाच्या शुभेच्छाही द्यायला ती विसरली नाही. या तरूणीचे नाव लिंडा असल्याचे समजते. तर तिच्या बेवफा प्रियकराचे नाव ग्राहम आहे. आपल्या प्रियकरावर असा सूड उगवणा-या तिच्या कल्पना शक्तीमुळे सध्या हे ग्राहम आणि लिंडा सोशल मीडियावर चर्चेत आले आहे.

वाचा : तुम्हीही रात्री चॅटिंग करता? जाणून घ्या फायदे आणि तोटे

Story img Loader