Optical Illusion: ऑप्टिकल इल्युजन असलेले फोटो सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होतात. लोक अशा प्रकारच्या ऑप्टिकल इल्युजनकडे आकर्षित होतात. अशाच एका हत्तीचा फोटो सोशल मीडियावर खूप ट्रेंड होत आहे.
नेटीझन्सचे डोक चक्रावले
ज्या कलाकाराने ती निर्माण केली आहे त्याने चतुराईने लोकांना विचार करायला भाग पाडले आहे. या फोटोतील हत्तीचा एकमेव उजवा पाय हा त्याचा मागचा डावा पाय आहे. फक्त तो पाय व्यवस्थितपणे रेखाटला आहे. हत्तीचे पाय शोधताना नेटीझन्सचे डोक चक्रावले आहे. अनेकांना योग्य उत्तर देता आले नाही.
(हे ही वाचा: वाघिणीने रानडुकरावर केला हल्ला, सुटण्यासाठी तो ओरडत राहिला आणि…; बघा Viral Video)
योग्य उत्तर शोधणे जवळजवळ अशक्य
या फोटोमध्ये हत्तीला किती पाय आहेत या प्रश्नाचे उत्तर देणे जवळजवळ अशक्य आहे. काही लोक ४ असे उत्तर देत आहेत तर काही ५ पायांचा हत्ती म्हणत आहेत. तुम्हीही एकदा हा फोटो पहा आणि या फोटोत तुम्हाला हत्तीचे किती पाय दिसत आहेत?
(हे ही वाचा: Viral: एका छोट्याशा बेडकाकडून महाकाय साप कसा हरला? IAS अधिकाऱ्यांनी शेअर केला संघर्षाचा Video)
(हे ही वाचा: गांजाच्या आहारी गेलेल्या मुलाला आईने दिली शिक्षा; खांबाला बांधून डोळ्यात टाकली मिर्ची पावडर; Video Viral)
‘हे’ आहे योग्य उत्तर
फोटो बारकाईने पाहिल्यास लक्षात येईल की हत्तीचे बाकीचे पाय पूर्णपणे तयार झालेले नाहीत. कलाकाराने काळजीपूर्वक त्याचे पाय रेखाटले नाही आणि मूळ पायांच्या दरम्यान पायांच्या प्रतिमा काळजीपूर्वक ठेवल्या. या भ्रमामुळे, फोटोमध्ये हत्तीला किती पाय आहेत हे सांगणे फार कठीण आहे. चित्रात हत्तीला केवळ ४ पाय असले तरी भ्रमामुळे त्यांची मोजणी करणे कठीण झाले आहे.