सोशल मीडियावर असे अनेक फोटो व्हायरल होत असतात, जे पाहून लोकं हैराण होतात. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर असा एक फोटो व्हायरल होत आहे, जो पाहून नेटकरी चक्रावले आहेत. हा फोटो समजून घेण्यासाठी लोकं आपल्या बुद्धीचा खूप वापर करत आहेत. तरी देखील या फोटोमधील रहस्य शोधण्यात बहुतेक लोक अपयशी ठरत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या फोटोमध्ये एका सोफ्यावर ६ मुली बसलेल्या दिसत आहेत. हा फोटो प्रथम दर्शनी अगदी सामान्य फोटो वाटतो. परंतु जेव्हा आपले लक्ष या मुलींच्या पायांकडे जाते तेव्हा आपल्या लक्षात येते की सोफ्यावर सहा मुली बसलेल्या असतानाही पायांच्या फक्त पाच जोड्या दिसत आहेत. या फोटोमध्ये एक पायांची जोडी गायब आहे. पण लक्षात येत नाही आहे की कोणत्या मुलीच्या पायांची जोड गायब आहे.

Viral Video: महिला जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थींनीसोबत केलेला ‘नगाडा बजा’वरील डान्स पाहून सारेच थक्क

हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत. काही लोक तर म्हणत आहेत की हा फोटो एडिट करून एका मुलीचे पाय गायब करण्यात आले आहेत. सध्या कोणालाच कळत नाही आहे की सहापैकी एका मुलीचे पाय कुठे गायब झाले आहेत.

चित्र पाहून अनेक युजर्स प्रश्न विचारत आहेत की यातील एक मुलगी पाय नसलेली होती का? तुम्ही चित्रात पाहू शकता की ५ महिला सोफ्यावर बसल्या आहेत तर एक महिला सोफ्याच्या उजव्या बाजूला बसली आहे. चार महिला पाय क्रॉस करून बसल्या आहेत. चित्रात डावीकडून तिसऱ्या क्रमांकावर बसलेल्या महिलेचे पाय गायब दिसत आहेत.