सापाला पाहिल्यानंतर सर्वजण घाबरून पळून जाण्याचा प्रयत्न करतात. साप लांब असला तरी त्याला बघून लोकांमध्ये भीती निर्माण होते. असाच एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये एका मोठ्या अजगराने गायीच्या वासरावर हल्ला केला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक मोठा अजगरा वासरावराला गिळण्याचा कसा प्रयत्न करत आहे हे दिसत आहे.

अजगराचा जोरदार हल्ला

व्हिडीओमध्ये १० फूट लांबीचा अजगर आधी गायीच्या गोठ्यात शिरतो, त्यानंतर वासरे घाबरून पळू लागतात. मात्र, अजगराला एका वासराला पकडण्यात यश येते. वासरू पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना अजगर त्याचा पाय घट्ट पकडतो. अजगराची पकड इतकी मजबूत असते की वासरू स्वतःला सोडवू शकत नाही. वासरू पळून जाण्यात यशस्वी झाला की अजगराचा शिकार झाला हे कळू शकलेले नाही. wildlifeanimall या अकाऊंटवरून इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ अपलोड केला आहे, ज्याचे कॅप्शन लिहिले आहे, ‘गायींच्या वासरावर सापाचा हल्ला… साप विरुद्ध वासरु.’

(हे ही वाचा: वराने वरमाळा घालताच, वधूने मारली कानाखाली आणि…; Video Viral)

(हे ही वाचा: बेरोजगारीवर तोडगा! पाटण्यातला ‘ग्रॅज्युएट चायवाली’चा video viral; नोकरी न मिळाल्यानं सुरू केला बिझनेस)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर यूजर्स आश्चर्यचकित झाले आहेत आणि प्रश्न विचारत आहेत की, व्हिडीओ बनवणारी व्यक्ती कोण आहे? एवढेच नाही तर सध्या या वासराचा मालक कुठे आहे आणि कोणीही त्याच्या मदतीला का येत नाही, असा सवालही नागरिक करत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘मला वाटते साप मेला आहे किंवा अर्धांगवायू झालेला आहे, की तो कृत्रिम साप आहे? शेतमालक अशा वेळी व्हिडीओ शूट करणार नाही आणि अशा गोष्टींचा निर्दयपणे आनंद घेणार नाही.’

Story img Loader