Python Attack Video : अजगर, सापाचे नाव ऐकले तरी भल्याभल्यांना भीती वाटते. कारण हा सरपटणारा प्राणी कधी कुठे जाऊन आपलं घर करेल काही सांगता येत नाही, त्यामुळे प्राण्यांबरोबर मनुष्यालाही त्यापासून अधिक धोका असतो. कारण सापाच्या एका दंशाने माणसाचा मृत्यू होऊ शकतो, तर अजगराच्या विळख्यात कोणी अडकलं तर त्याचा मृत्यू होणार हे निश्चित असतं. त्यामुळे लोक या प्राण्यांपासून दोन हात लांब राहतात. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का, एक भलामोठा अजगर अचानक घरात शिरला तर? ऐकूनच भीती वाटली ना? पण, प्रत्यक्षात एका महिलेच्या घरात महाकाय अजगर घुसला आणि त्याने तिच्यावर हल्ला करत विळखा घातला. त्या महाकाय अजगराने महिलेच्या हातांपासून खाली संपूर्ण शरीराला विळखा घातला. धक्कादायक म्हणजे अजगराने त्या महिलेला चक्क जिवंत गिळण्याचा प्रयत्न केला. काळजात धडकी भरविणाऱ्या या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हालाही घाम फुटल्याशिवाय राहणार नाही.

Read More Latest News : मुंबईकरांनो, गाडी चालवताना सावधान! पावसामुळे रस्त्यांवर फिरतोय भलामोठा अजगर; Video मध्ये पाहा गोरेगावमधील भीतीदायक दृश्य

'Gir Mat Jaana': Viral MP Woman's Dance Fails To Impress Netizens funny video goes viral
गावच्या महिलेचा ट्रेंडिंग गाण्यावर तुफान डान्स; मारल्या अशा स्टेप की VIDEO पाहून पोट दुखेपर्यंत हसाल
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Two girls fighting at collage over a guy shocking video viral on social media
प्रेमासाठी काय पण! एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींचा झिंज्या उपटत तुफान राडा; VIDEO पाहून व्हाल हैराण
A bull attacked a scooter driver who came under the truck viral video on social media
बैलाने मारली उडी अन् स्कूटर चालक गेला ट्रकच्या खाली, पुढे नेमकं काय घडलं? पाहा धक्कादायक VIDEO
Viral Video Shows Pet Dog Help Her Owner
मैं हूँ ना…! मालकिणीला मदत करण्यासाठी श्वानाची धडपड; काठी काढण्यासाठी मारली उडी अन्… पाहा VIRAL VIDEO
Murder of woman in Hadapsar area body was kept in bed compartment
हडपसर भागात महिलेचा खून, मृतदेह पलंगातील कप्यात ठेवल्याचे उघड
Police found dead body of a boy in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला
Young Girl Performs Lavani Dance
गौतमी पाटील तरुणीसमोर फेल! सादर केली सुरेख लावणी, VIDEO होतोय व्हायरल

अजगराने महिलेच्या संपूर्ण शरीराला घातला विळखा अन्…

अजगराने महिलेच्या संपूर्ण शरीराभोवती विळखा घातला आणि तिच्या शरीरावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला; यावेळी अजगराच्या तावडीतून सुटण्यासाठी महिलेची जवळपास दोन तास धडपड सुरू होती, पण तिला काही यश आले नाही. उलट अजगर त्या महिलेच्या शरीराभोवती आवळलेला फास आणखी घट्ट करीत होता, यामुळे हळूहळू तिला श्वास घेण्यासही त्रास जाणवू लागला. अखेर सुटका करून घेणे कठीण झाल्याने तिने आरडाओरड केला. यावेळी शेजारील लोकांनी धाव घेत वनविभागाच्या लोकांना पाचारण केले आणि महिलेचा जीव वाचवला. पण, अजगराने महिलेच्या पायावर चावा घेतला आणि तिला दुखापत केली.

व्हिडिओमध्ये दिसणारी महिला थायलंडची असून तिचे नाव अरोम अरुणरोज आहे. महिलेचे वय ६४ आहे. महिलेने स्थानिक प्रसारमाध्यमांना सांगितले की, ती स्वयंपाकघरात पाणी पित होती, यावेळी पाठीमागून एका महाकाय अजगरानं तिच्यावर हल्ला केला, अजगराने तिला चावा घेतला. त्यानंतर त्याने तिच्या कमरेभोवती आपला फास गुंडाळला, अजगराने हळहळू महिलेच्या संपूर्ण शरीराभोवती विळखा घातला. महिलेने पुढे सांगितले की, तिने अजगरापासून स्वत:ला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला पण अजगराने तिला अशा प्रकारे विळखा घातला होता की, तिला उभेही राहता येत नव्हते. हळूहळू अजगराने आपली पकड इतकी घट्ट केली की, महिलेला हालचाल करणे कठीण झाले. ती कशीबशी दरवाजाजवळ येऊन पडून राहिली.

Read More Latest News : मृत्यूनंतर कोणता अवयव किती वेळ जिवंत असतो? यावेळी शरीरात नेमके कोणते बदल होतात? वाचा

महिलेने जीव वाचवण्यासाठी केला आरडाओरडा (Python Attack Shocking Video)

महिलेचा आरडाओरडा ऐकून शेजाऱ्यांनी घेतली मदतीसाठी धाव

यावेळी महिलेने जीव वाचवण्यासाठी केलेला आरडाओरडा ऐकून शेजाऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली. शेजाऱ्यांनी ताबडतोब वन अधिकाऱ्यांना फोन करून महिलेच्या घरी बोलावले. काही वेळातच वन विभागाची रेस्क्यू टीम तिथे पोहोचली. जेव्हा टीम तिथे पोहोचली तेव्हा त्यांनी पाहिले की, अजगराने महिलेचा गळा दाबला होता आणि तिला श्वास घेण्यासही त्रास होत होता. अशा स्थितीत टीमने आधी अजगराचे तोंड पकडले आणि नंतर हळूहळू महिलेची सुटका केली. महिलेला वाचवण्यासाठी टीमला किमान २ तास लागले .बचाव केल्यानंतर महिला पूर्णपणे पिवळी पडली होती, तसेच तिला श्वास घेण्यास त्रास होत होता. यात महिलेलाही किरकोळ दुखापत झाली होती. त्यामुळे तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर तिची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.