Snake Viral Video: तुम्ही सोशल मीडियावर अनेकदा सापांविषयीचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. अनेकजण सापांना अंगावर खेळवतानाचे व्हिडीओ देखील भरपूर प्रमाणात व्हायरल होत असतात. अशा परिस्थितीत साप पाळणे किती धोकादायक ठरू शकते, याचा पुरावा हा व्हिडिओ देतो. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कोणाचाही थरकाप उडू शकतो.

अजगराने महिलेवर हल्ला केला

या व्हिडिओमध्ये एक महिला आपल्या पिंजऱ्यातून सापाला बाहेर काढताना दिसत आहे. ती त्याला ‘हॅलो बेबी’ म्हणत हात समोर धरते. मात्र या महिलेलाही कल्पना नसेल की येत्या काही सेकंदात आपल्यासोबत काय होणार आहे. यानंतर जे झाले पाहण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहा.

( हे ही वाचा: Viral Video: अमेरिकेतील एका व्यक्तीने आपल्या डोळ्यात लावली चक्क Flash Light! कारण वाचून बसेल आश्चर्याचा धक्का)

महिलेची अवस्था कशी झाली ते एकदा पाहाच

पिंजऱ्यात असलेला अजगर महिलेवर हल्ला करतो आणि तिचा हात अशाप्रकारे पकडून ठेवतो की तिला तो सोडवता देखील येत नाही. हात सोडवता येत नसल्याने ती महिला मदतीसाठी तिथे असलेल्या एका व्यक्तीला बोलावते. तेव्हा दोघे मिळून अजगरापासून सुटका मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. मात्र दोघांनाही ते जमत नाही. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की महिलेच्या हातातून रक्त येत आहे तरीही अजगर तिचा हात सोडायला तयार नाही आहे.

( हे ही वाचा: Viral Video: घरासमोरील पणत्यांची दुकाने पाहून डॉक्टर महिलेचे डोकेच फिरले; नंतर बॅट घेऊन असं काही केलं की…)

व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. आत्तापर्यंत लाखो लोकांनी तो पाहिला आहे आणि हजारो लोकांनी व्हिडिओला लाईक देखील केले आहे. इतकंच नाही तर कमेंट सेक्शनमध्येही अनेकजण अवघ्या दीड मिनिटांच्या या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

Story img Loader