Python Attack Man Viral Video: साप किंवा अजगर पाहिला तरी अनेक लोक खूप घाबरतात, काहींना तर अक्षरशः घाम फुटतो. मग तो साप विषारी असो वा नसो, त्यापासून दोन हात दूर राहणे पसंत करतात. पण, काही लोक इतके धाडसी असतात की जे सापांना किंवा महाकाय अजगराला अगदी सहज पकडतात आणि त्यांच्याबरोबर व्हिडीओ, फोटो काढत राहतात. मात्र, असं करताना अनेकदा भीषण घटना घडतात.सध्या असाच एक भयानक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात एक तरुण महाकाय अजगर हातात घेऊन स्टंटबाजी करत होता. यावेळी महाकाय अजगराने क्षणात त्याच्या तोंडावर झडप घातली, त्यानंतर जे काही घडले ते पाहताना तुमच्याही अंगाचं पाणी पाणी होईल.
अजगराबरोबर स्टंट करणं किती धोकादायक आहे, हे या व्हिडीओवरून समजू शकतं. या व्हिडीओमध्ये एक तरुण आपल्या हातात महाकाय अजगर पकडून स्टंट करत होता. अजगराचे तोंड पकडून तो फोटोसाठी पोज देत होता. तरुण आपल्या चेहऱ्याजवळ या अजगराचे तोंड घेऊन गेला. यावेळी त्याने विचारही नसेल केला की, अजगर आपल्याला वाईटप्रकारे इजा करेल. पण, शेवटी कितीही झालं तरी तो अजगर; त्याने आपल्या स्वभावाप्रमाणे संधी मिळताच तरुणाच्या तोंडावर झडप घातली. अजगराचे विषारी दात थेट तरुणाच्या गालात जाऊन रुतले, यानंतर अनेक सेकंद तरुण अजगराच्या जबड्यातून सुटका करण्याचे प्रयत्न करतो, पण यात तो गंभीररित्या जखमी होतो. त्यामुळे साप, अजगराबरोबर स्टंटबाजी करणे किती जीवघेणे ठरू शकते हे समजू शकते.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तरुणाने एका अजगराला हातात धरले आहे आणि तो कॅमेराकडे तोंड करून पोज देत आहे. अजगराचे तोंड तरुणाच्या चेहऱ्याच्या अगदी जवळ होते. त्यामुळे अजगराने काही समजण्याच्या आत त्याच्या चेहऱ्यावर झडप घेतली, अजगराने आपल्या जबड्यात तरुणाचा चेहरा पकडला आणि दात गालात रुतवले. यावेळी प्रयत्न करूनही अजगराच्या जबड्यातून तरुण आपली सुटका करू शकला नाही. यानंतर तरुणाने आपल्या दोन हातांनी अजगराला सोडवण्याचा प्रयत्न केला, पण त्याला यश येत नव्हते. शेवटी त्याने अजगराच्या जबड्याचे दोन भाग आपल्या हातांनी धरले आणि कशी तरी आपली सुटका करून घेतली. पण, यात तरुण गंभीररित्या जखमी झाला आहे.
या व्हिडीओला एक कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने कमेंट करत लिहिले की, त्या व्यक्तीला अजगराने जबड्यात पकडले तरी त्याची कॅमेरामनला पर्वा नाही. दुसऱ्या युजरने लिहिले की, तुम्ही मूर्खपणा कराल तर हेच होईल. तर तिसऱ्या युजरने लिहिले की, हा खतरों का खिलाडी आहे.