Shocking video : साप, अजगर हे शब्द जरी उच्चारले तरी अंगावर काटा येतो. मानवी वस्तीत अनेकदा साप किंवा अजगर आढळून येतात. सोशल मीडियावर याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहिल्यानंतर अंगावर काटा येतो. सध्या असाच एक जंगलातला एका अजगराचा थरारक व्हिडीओ समोर आलाय. हा व्हायरल व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हीही सुन्न व्हाल. एका महाकाय अजगरानं हरणाला गिळलं आहे. याचा सध्या समोर आलेला व्हिडीओ पाहून तुमचा थरकाप उडेल आणि त्यानंतर त्यामध्ये गावकऱ्यांनी जे केलं, ते पाहूनही धक्का बसेल.
अजगर हा सर्वात खतरनाक साप म्हणून ओळखला जातो. तो आपली शिकार जशीच्या तशी गिळतो. अगदी एखाद्या अख्ख्या हरणाला देखील तो फस्त करु शकतो. अजगराने केलेल्या अशाच एका शिकारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तो एका जिवंत हरणाला गिळताना दिसत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे केवळ १२ सेकंदात या अजगरानं हरणाला गिळून टाकलं. हा व्हिडीओ पाहून तुम्ही देखील थक्कच व्हाल.
अजगराने हरणाच्या शरीराला विळखा घातला त्याला मारलं आणि मग काही क्षणांमध्ये त्याचं पूर्ण शरीर गिळून टाकलं. जणू एखाद्या पिशवीमध्ये सामान भरावं त्या गतीनं हरण्याची शिकार झाली. आश्चर्याची बाब म्हणजे अजगरानं केवळ १२ सेकंदाच हरणाला फस्त केलं. हा प्रकार पाहून आसपास उभी असलेली माणसं देखील थक्कच झाली.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरीही थक्क झाले असून व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “चपळता हरली” तर आणखी एकानं म्हंटलं, “बापरे एवढी ताकद”
अजगरांमध्येही वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. अजगर हा उष्ण कटिबंधात वावरणारा सर्वांत मोठा बिनविषारी सर्प आहे. सरीसृप वर्गातील बोइडी कुलातील पायथॉनिनी उपकुलात त्याचा समावेश होतो. जगाच्या विविध भागांत अजगराच्या अनेक जाती आढळतात. पायथॉन मोलुरस या जातीचे अजगर संपूर्ण भारत, सुमात्रा व जावा या प्रदेशात अधिक आढळते. याला इंडियन रॉक पायथॉन असेही म्हणतात. घनदाट वनात, झाडावर तसेच खडकाळ जमिनींवरही यांचा वावर असतो. मध्य व दक्षिण अमेरिकेत आढळणारे व पिलांना जन्म देणारे पाणअजगर अँनॅकाँडा म्हणून ओळखले जातात.