घराबाहेर ठेवलेली पत्रपेटी तुम्ही समजा आतुरतेने उघडायला गेलात आणि त्याल एक भलामोठा अजगर तुम्हाला आराम करताना दिसला तर..? ऐकूनच घाम फुटला ना? अशाच काहीसा प्रसंग क्वीसलँडमधील एका तरुणावर आला. आपल्या घराबाहेर ठेवण्यात आलेली पत्रपेटी मॅक्स उघडायला गेला पण ही पेटी उघडताच त्याला धक्का बसला. कारण यामध्ये अजगर निवांतपणे आराम करत होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Viral Video : घोरपडीच्या सुटकेचा थरार तुमचा श्वास रोखून धरेल!

क्वीसलँडमधील मॅक्स या तरुणाच्या घराबाहेर बसवण्यात आलेल्या पत्रपेटीत त्याला अजगर सापडला. ख्रिसमससाठी आपल्याला आलेली शुभेच्छा पत्र काढण्यासाठी मॅक्सने आपल्या घराबाहेर बसवण्यात आलेली पत्रपेटी उघडली. तर त्यात चक्क लांबलचक अजगर आराम करत होता. त्यामुळे घाबरून मॅक्सने सर्पमित्रांना फोन केला. काही वेळातच सर्पमित्र तिथे आले. पण हा अजगर काही केल्या बाहेर येईना. या अजगराला आपले नवीन घर इतके आवडले की त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करणा-या सर्पमित्रावर त्याने हल्ला करायलाही मागे पुढे पाहिले नाही.  काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियातल्या एका महिलेच्या घरात देखील असाच प्रकार घडला होता. तिच्या घरातील ख्रिसमस ट्रीवर विषारी साप वेटोळे देऊन बसला होता. शेवटी सर्पमित्रांच्या मदतीने तिने या विषारी पाहुण्याला घरातून बाहेर हाकलवून दिले होते.

Snake on a plane: उडत्या विमानात साप दिसल्याने प्रवाशांची धावाधाव